नागपुरात साडेतीन हजारावर मतदार शंभरीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 09:22 PM2021-01-28T21:22:51+5:302021-01-28T21:24:04+5:30

above hundred year voters, nagpur news अंतिम मतदार यादी नुकतीच जारी करण्यात आली आहे. या नवीन मतदार यादीनुसार नागपूर जिल्ह्यात तब्बल ३,७७४ मतदार हे वयाची शंभरी पार केलेले आहेत.

In Nagpur, there are over three and a half thousand voters of above hundred year | नागपुरात साडेतीन हजारावर मतदार शंभरीपार

नागपुरात साडेतीन हजारावर मतदार शंभरीपार

googlenewsNext
ठळक मुद्देदक्षिण-पश्चिम नागपुरात सर्वाधिक ५२६ मतदार : तर सर्वात कमी काटोलमध्ये १२ मतदार १०० वर्षांचे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अंतिम मतदार यादी नुकतीच जारी करण्यात आली आहे. या नवीन मतदार यादीनुसार नागपूर जिल्ह्यात तब्बल ३,७७४ मतदार हे वयाची शंभरी पार केलेले आहेत. यात सर्वाधिक ५२६ शंभरी पार केलेले मतदार हे दक्षिण-पश्चिम नागपुरात आहेत. तर सर्वात कमी १२ शंभरी पार मतदार काटोल विधानसभा मतदार संघात आहेत.

जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार नागपूर जिल्ह्यात ४२ लाख ३० हजार ७५३ मतदार आहेत. निवडणूक विभागातर्फे वर्षातून दोनवेळा मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबविले जाते. यात तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळतो. याही वेळी तो मिळाला. असे १८ ते १९ वर्षाचे तरुण मतदार जिल्ह्यात ५०,८८० इतके आहेत. २० ते २९ वर्षाचे मतदार ७ लाख ७ हजार ७१७ इतके आहेत. ३० ते ३९ वयोगटातील १० लाख २७ हजार ८७ मतदार आहेत. ४० ते ४९ वयोगटातील १० लाख ६ हजार ३२८ मतदार आहेत. ५० ते ५९ वयोगटातील ६ लाख ८२ हजार ४८३ मतदार, ६० ते ६९ वयोगटातील ४ लाख ५ हजार २६१ मतदार, ७० ते ७९ वयोगटातील २ लाख २४ हजार ३११ मतदार, ८० ते ८९ वयोगटातील ९८ हजार ९६९ मतदार आणि ९० ते ९९ वयोगटातील २३ हजार ९४३ मतदार नागपूर जिल्ह्यात आहेत.

असे आहेत तालुकानिहाय शंभरी पार करणारे मतदार

काटोल - १२

सावनेर - २७८

हिंगणा - २१७

उमरेड - १७१

कामठी - २४८

रामटेक - ३६९

दक्षिण-पश्चिम नागपूर- ५२६

दक्षिण नागपूर- ३७३

पूर्व नागपूर - ३१३

मध्य नागपूर - ४७३

पश्चिम नागपूर - ४७२

उत्तर नागपूर - ३२२

एकूण - ३,७७४

Web Title: In Nagpur, there are over three and a half thousand voters of above hundred year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.