Nagpur: जावई कुलूप लावून जाताच सासू-सासऱ्यांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, दागिने चोरले

By दयानंद पाईकराव | Published: August 27, 2023 01:20 PM2023-08-27T13:20:42+5:302023-08-27T13:22:55+5:30

Nagpur Crime: सासु-सासरे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या घराला कुलुप लाऊन जावई आपल्या घरी परतले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या सासऱ्याच्या घरातील ७३ हजारांचे दागीने चोरून नेले. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री १.३० ते २.३० दरम्यान घडली.

Nagpur: Thieves broke into mother-in-law's house after son-in-law locked it, stole jewelry | Nagpur: जावई कुलूप लावून जाताच सासू-सासऱ्यांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, दागिने चोरले

Nagpur: जावई कुलूप लावून जाताच सासू-सासऱ्यांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, दागिने चोरले

googlenewsNext

- दयानंद पाईकराव 
नागपूर - सासु-सासरे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या घराला कुलुप लाऊन जावई आपल्या घरी परतले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या सासऱ्याच्या घरातील ७३ हजारांचे दागीने चोरून नेले. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री १.३० ते २.३० दरम्यान घडली.

सतिश रजनीकांत इटकेलवार (वय ५२, रा. विघ्नहर्ता अपार्टमेंट हिलटॉप रामनगर) यांच्या सासु-सासऱ्यांचे हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अयोध्यानगर येथे घर आहे. सासु-सासऱ्यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या घराची देखरेख इटकेलवार हे करतात. शनिवारी ते सासऱ्याच्या घराला कुलुप लाऊन आपल्या घरी रामनगर येथे परतले. अज्ञात आरोपीने त्यांच्या सासºयाच्या घराचे कुलुप तोडून बेडरूममधील आलमारीतून सोन्या-चांदीचे दागीने किंमत ७३ हजार चोरून नेले. इटकेलवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Web Title: Nagpur: Thieves broke into mother-in-law's house after son-in-law locked it, stole jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.