नागपुरात खंडणीसाठी मेडिकल स्टोअरच्या संचालकाला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 02:09 PM2018-05-15T14:09:38+5:302018-05-15T14:09:48+5:30
खंडणीसाठी मेडिकल स्टोअरच्या संचालकाला धमकी देऊन एका कुख्यात गुंडाने १,१०० रुपये हिसकावून नेले. सोमवारी दुपारी सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खंडणीसाठी मेडिकल स्टोअरच्या संचालकाला धमकी देऊन एका कुख्यात गुंडाने १,१०० रुपये हिसकावून नेले. सोमवारी दुपारी सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
विशाल सुरेंद्रकुमार जैन (वय ४२) यांचे उमरेड मार्गावरील ताजश्री टॉवरमध्ये मेडिकल स्टोअर आहे. सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ते त्यांच्या दुकानात हजर होते. या भागातील कुख्यात गुंड सोनू दांडेकर तेथे आला. ‘मेरा नाम सोनू दांडेकर है. मै वसुली करणे आया हू. यहां के सब लोग मुझे हप्ता देते है. मुझे ५ हजार रुपये दो’, असे तो म्हणाला. जैन यांनी त्याला खंडणी देण्यास नकार दिला असता आरोपीने त्यांना ‘खुद के बच्चे प्यारे नही क्या’, असे विचारत जैन यांच्या गल्ल्यातील १,१०० रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर धमकी देऊन आरोपी दांडेकर पळून गेला. जैन यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी जबरी चोरी आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
आरोपी गजाआड
सक्करद-याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक विठ्ठल महाडिक यांनी आपल्या सहका-यांसह आरोपी दांडेकरची शोधाशोध केली. रात्री तो घरी आल्याचे कळताच त्याच्या मुसक्या बांधण्यात आल्या. आरोपी दांडेकर हा कुख्यात गुंड आहे. त्याच्याविरुद्ध लुटमार, हाणामारी, चोरी, जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.