नागपुरातील नागलोकमध्ये गुरुवारपासून आंतरराष्ट्रीय धम्मपरिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:12 PM2018-10-16T23:12:06+5:302018-10-16T23:17:36+5:30
त्रिरत्न बौद्ध महासंघ, नागलोक व नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक विजयादशमीच्या पर्वावर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन सोहळा व आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे उद्घाटन १८ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नागलोक परिसरात करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्रिरत्न बौद्ध महासंघ, नागलोक व नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक विजयादशमीच्या पर्वावर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन सोहळा व आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे उद्घाटन १८ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नागलोक परिसरात करण्यात आले आहे.
या धम्म परिषदेचे उद्घाटन बोशन झेन्गई मोन्यास्ट्री चीनचे प्रमुख भंते रेन डा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ. यो (चीन), विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, भंते रतन थेरो (श्रीलंका), चोंग शेंग मंदिर चीनचे प्रमुख मास्टर चॉग हुआ, सेवालंका फाऊंडेशन श्रीलंकेचे अध्यक्ष हर्षकुमार नवरत्ने प्रमुख पाहुणे राहतील. त्रिरत्न बौद्ध महासंघ भारतचे संस्थापक व नागार्जुन प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष धम्मचारी लोकमित्र हे अध्यक्षस्थानी राहतील. १९ व २० आॅक्टोबर रोजी ‘भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुत्थान आणि दक्षिण आशियातील बौद्ध धम्माच्या गतिशीलतेवर त्याचा प्रभाव’ या विषयावर आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.