नागपुरात आतापर्यंत अनधिकृत ४६१ धार्मिक स्थळे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:45 AM2018-08-03T00:45:44+5:302018-08-03T00:48:41+5:30

मनपा व नागपूर सुधार प्रन्यासने शहरात १५०४ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडल्याचा दावा करीत याची यादी उच्च न्यायालयात सादर केली होती. परंतु दोन्ही संस्थांनी धार्मिक स्थळांबाबत असलेला अ‍ॅक्शन प्लॅन सादर केला नव्हता. यावर न्यायालयाने २१ जून रोजी मनपा व नासुप्रला फटकारले. अखेर मनपाने २२ जूनपासून अनधिकृत धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई सुरु केली. याप्रकारे मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत ४२ दिवसात २७५ अनधिकृत धार्मिक स्थळांना जमीनदोस्त केले आहे तर नासुप्रने २५ जूनपासून कारवाई सुरु केली. त्यांनी ३९ दिवसात १८६ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडली. अशी एकूण ४६१ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यात आली आहेत.

In Nagpur, till now, unauthorized 461 religious places have collapsed | नागपुरात आतापर्यंत अनधिकृत ४६१ धार्मिक स्थळे जमीनदोस्त

नागपुरात आतापर्यंत अनधिकृत ४६१ धार्मिक स्थळे जमीनदोस्त

Next
ठळक मुद्देमनपाने २७२ व नासुप्रने १८६ पाडली : मनपा २३ टक्के, नासुप्र ५६ टक्के कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपा व नागपूर सुधार प्रन्यासने शहरात १५०४ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडल्याचा दावा करीत याची यादी उच्च न्यायालयात सादर केली होती. परंतु दोन्ही संस्थांनी धार्मिक स्थळांबाबत असलेला अ‍ॅक्शन प्लॅन सादर केला नव्हता. यावर न्यायालयाने २१ जून रोजी मनपा व नासुप्रला फटकारले. अखेर मनपाने २२ जूनपासून अनधिकृत धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई सुरु केली. याप्रकारे मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत ४२ दिवसात २७५ अनधिकृत धार्मिक स्थळांना जमीनदोस्त केले आहे तर नासुप्रने २५ जूनपासून कारवाई सुरु केली. त्यांनी ३९ दिवसात १८६ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडली. अशी एकूण ४६१ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मनपा व नासुप्रच्या चमूने यादीनुसार त्यांच्या क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळाजवळील लहानलहान स्थळांनाही तोडले आहे. तसेच अनेक ठिकाणी १९६० च्या पूर्वीचे शासकीय रेकॉर्डमध्ये असलेल्या धार्मिक स्थळांनाही यादीमध्ये टाकण्यात आल्याने सामान्य नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. दुसरीकडे शासकीय जागेवर, खासगी जागेवर बळजबरीने कब्जा करण्याच्या इराद्याने बांधलेल्या धार्मिक स्थळाविरुद्ध मात्र कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे.
           एकूण         दिवस        कारवाई          टक्के
मनपा : ११७५           ४२           २७५             २३
नासुप्र : ३३०             ३९            १८६             ५६
 

 

Web Title: In Nagpur, till now, unauthorized 461 religious places have collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.