Nagpur | गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सूट, वाहनांसाठी पास जारी 

By सुमेध वाघमार | Published: August 30, 2022 05:38 PM2022-08-30T17:38:49+5:302022-08-30T17:43:00+5:30

परिवहन विभागाने, २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीसाठी गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

Nagpur | Toll exemption for Ganesha devotees going to Goa and Konkan, Need to get toll pass from RTO | Nagpur | गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सूट, वाहनांसाठी पास जारी 

Nagpur | गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सूट, वाहनांसाठी पास जारी 

Next

नागपूर : यंदा गणेशोत्सवानिमित्त उपराजधानितून गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल टॅक्स लागणार नाही. परंतु त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर येथून टोल पास घेणे गरजेचे आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार यांनी दिली.

 कोरोनाचा प्रादूर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून गणेश उत्सवासाठी अनेक गणेशभक्तांना घराबाहेर पडता आले नाही. परंतु आता अनेकांनी कोकणात जाण्याचा पर्याय निवडला आहे. या भागात जाण्याकरीता खासगी व प्रवासी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याची पूर्व दखल घेत २१ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत गणेश उत्सवानिमित्त गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमधून सूट मिळावी म्हणून परिवहन विभागाने टोल पास जारी करावेत अशा त्यांचा सूचना होत्या. त्यानुसार परिवहन विभागाने, २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीसाठी गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यासाठी आवश्यक टोल पास घ्यावे लागणार आहे. 

इथे मिळणार टोल पास

गिरीपेठ येथील आरटीओ नागपूर शहर कार्यालयातील तळमजल्यावर पास जारी करण्याकरीता स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहे. चालकाने वाहनाची ‘आरसी’, ‘इन्शुरन्स’ व ‘पीयुसी’सोबत ठेवणे गरजेचे आहे.

Web Title: Nagpur | Toll exemption for Ganesha devotees going to Goa and Konkan, Need to get toll pass from RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.