अर्थ डे नेटवर्क स्पर्धेतील विजेत्या शहरात नागपूरच अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 10:07 PM2018-05-05T22:07:48+5:302018-05-05T22:07:59+5:30

पर्यावरण संरक्षणासाठी जगभरात कार्यरत असलेल्या अर्थ डे नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील शहरांसाठी ‘शहर ग्रीन करो’ या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या ४८ शहरांनी सहभाग घेतला होता यातील विजेत्या दहा शहरात नागपूरने अव्वल क्रमांक मिळविला आहे.

Nagpur tops the winning city of Earth Day Network tournament | अर्थ डे नेटवर्क स्पर्धेतील विजेत्या शहरात नागपूरच अव्वल

अर्थ डे नेटवर्क स्पर्धेतील विजेत्या शहरात नागपूरच अव्वल

Next
ठळक मुद्देविजेत्या दहा शहरांची यादी घोषित : मनपा आणि ग्रीन व्हिजीलला बहुमान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्यावरण संरक्षणासाठी जगभरात कार्यरत असलेल्या अर्थ डे नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील शहरांसाठी ‘शहर ग्रीन करो’ या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या ४८ शहरांनी सहभाग घेतला होता यातील विजेत्या दहा शहरात नागपूरने अव्वल क्रमांक मिळविला आहे. या यादीत महाराष्ट्रातील नागपूर सोबतच मुंबई आणि पुणे शहरानेही यात स्थान पटकाविले आहे.
पर्यावरण संरक्षणासाठी अर्थ डे नेटवर्क ही आंतरराष्ट्रीय संस्था सन १९७० पासून कार्यरत आहे. वसुंधरा वाचविण्याचा संदेश देत वर्षभर पर्यावरणविषयक जनजागृतीचे उपक्रम जगभरात राबविले जातात. या संस्थेच्या माध्यमातून नागपुरात महापालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशन वर्षभर पर्यावरणविषयक जनजागृतीसंदर्भात उपक्रम राबविले. ज्या शहरातील उपक्रमांची व्याप्ती मोठी होती, त्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती झाली, या जनजागृतीचा लोकजीवनावर प्रभाव पडला अशा दहा शहरांना स्पर्धेतील विजेते घोषित करण्यात आले. विजेत्यांमधील नागपूर हे एकमेव असे शहर आहे ज्यामध्ये पर्यावरणविषयक जनजागृतीमध्ये पर्यावरणवादी संस्थेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग आहे. नागपुरातील ग्रीन व्हिजील फाऊंडेशन या पर्यावरणवादी संस्थेसोबत नागपूर महापालिकेचा सहभाग आहे.
नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
पर्यावरणविषयक कार्यात अर्थ डे नेटवर्क ने नागपूरला दिलेला हा बहुमान म्हणजे नागपूरकरांचा सन्मान आहे. नागपूरकर आता स्वच्छतेविषयी आणि पर्यावरण रक्षणाविषयी जागरुक झाले आहे. या पुरस्कारामुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नंदा जिचकार, महापौर

नागपूरचा सन्मान वाढला
कुठल्याही समस्येवर मात करायची असेल तर जनजागृती आणि लोकसहभाग महत्त्वाचा असतो. पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी महापालिेसोबतच ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने पुढाकार घेतला. या पुरस्काराने आता जबाबदारी आणखी वाढली आहे. जिल्हाधिकारी या नात्याने आता संपूर्ण जिल्हाभरात असे उपक्रम राबविण्याचा आपला प्रयत्न राहील.
अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी

हा नागपूरकरांचा सन्मान
अर्थ डे नेटवर्क ही जागतिक स्तरावर कार्य करणारी संस्था आहे. अशा पुरस्कारांमुळे कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते. ग्रीन व्हिजील फाऊंडेशन योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याचे हे प्रमाणपत्र आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांंनी आयुक्त असताना सहकार्य केले. हा नागपूरकरांचा सन्मान आहे
कौस्तुभ चॅटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजील फाऊंडेशन

 

 

 

 

Web Title: Nagpur tops the winning city of Earth Day Network tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.