नागपुरात  पहिल्याच दिवशी ३०० काेटींचा व्यापार बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 09:50 PM2021-02-27T21:50:09+5:302021-02-27T21:52:05+5:30

Corona Virus, Trade of 300 crores sank शहरात पुन्हा डाेके वर काढणाऱ्या काेराेनाविरुद्ध लढ्यात प्रशासनाला व्यापाऱ्यांची समर्पित साथ मिळाली. रुग्णवाढ हाेत असल्याने जिल्हा व मनपा प्रशासनाने शनिवार आणि रविवारी बंद पाळण्याच्या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रतिष्ठाने बंद ठेवली.

In Nagpur, the trade of 300 crores sank on the first day itself | नागपुरात  पहिल्याच दिवशी ३०० काेटींचा व्यापार बुडाला

नागपुरात  पहिल्याच दिवशी ३०० काेटींचा व्यापार बुडाला

Next
ठळक मुद्देमुख्य बाजारपेठांमध्ये शुकशुकाट : काेराेनाविरुद्ध लढ्यात व्यापाऱ्यांची साथ

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : शहरात पुन्हा डाेके वर काढणाऱ्या काेराेनाविरुद्ध लढ्यात प्रशासनाला व्यापाऱ्यांची समर्पित साथ मिळाली. रुग्णवाढ हाेत असल्याने जिल्हा व मनपा प्रशासनाने शनिवार आणि रविवारी बंद पाळण्याच्या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रतिष्ठाने बंद ठेवली. इतवारी, महाल, गांधीबाग, कळमना, जरीपटक्यासह शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सकाळपासून शुकशुकाट पसरला हाेता. मात्र या बंदमुळे या सुटीच्या दिवसात हाेणारी २५० ते ३०० काेटींची उलाढाल ठप्प पडल्याचा अंदाज आहे.

जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता बाकी व्यापार दाेन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला हाेता. प्रशासनाच्या या आवाहनाला व्यापाऱ्यांनी स्वीकारले. महामारीमुळे अनेक महिने बंद राहिल्याने आधीच व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. मात्र या विळख्यातून स्वत:ला, कुटुंबाला व ग्राहकांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. नागविदर्भ चेंबर ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत विविध बाजारपेठांमध्ये फिरून काेराेना लढ्यात व्यापाऱ्यांना प्रशासनाचे सहकार्य करण्याचे व बंद पाळण्याचे आवाहन केले हाेते. शनिवारीही त्यांनी स्थितीचा आढावा घेतला. सर्वत्र शुकशुकाट पसरला हाेता. केवळ औषधी, भाजी, फळ व पेट्राेल पंपासह इतर जीवनावश्यक वस्तूंची प्रतिष्ठाने सुरू हाेती. बंदबाबत माहिती असल्याने नागपूरसह जिल्हा व बाहेरील शहरातील लाेकही खरेदीसाठी आले नसल्याचे मेहाडिया यांनी सांगितले. आवक-जावकही बंद हाेती. दरम्यान, या बंदमुळे शहरात एका दिवसात व्यवसायाला ३०० काेटींचा फटका बसल्याची माहिती त्यांनी दिली. रविवारीही दुकाने अशीच कडकडीत बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कडकडीत बंद पाळला

इतवारी भागातील धान्य बाजार, लाेहा बाजार, सराफा ओळी, कापड बाजार तसेच कळमना धान्य बाजार, महाल, सक्करदरा, भंडारा राेड मार्केट, गांधीबाग, तीननल चाैक, जरीपटका, खामला, सीताबर्डी या शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद पाळला गेला.

Web Title: In Nagpur, the trade of 300 crores sank on the first day itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.