नागपूर वाहतूक पोलिसांचा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा ‘हंटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:34 PM2018-07-26T23:34:30+5:302018-07-26T23:43:09+5:30

नागपूरकरांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र स्वत:च्या जबाबदारीची जाणीव नसलेल्या नागरिकांकडून सर्रासपणे वाहतुकीचे नियम तोडले जातात. या वर्षातील अवघ्या सहा महिन्यांत वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या सव्वा लाखांहून अधिक नागरिकांवर कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा कारवाईचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून वाहतुकीच्या बेशिस्तीची ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Nagpur Traffic Police's 'Hunter' on indiscipline vehicles riders | नागपूर वाहतूक पोलिसांचा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा ‘हंटर’

नागपूर वाहतूक पोलिसांचा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा ‘हंटर’

googlenewsNext
ठळक मुद्देसहा महिन्यात नियम तोडणाऱ्या १ लाख ३३ हजार ५४२ वाहनचालकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकरांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र स्वत:च्या जबाबदारीची जाणीव नसलेल्या नागरिकांकडून सर्रासपणे वाहतुकीचे नियम तोडले जातात. या वर्षातील अवघ्या सहा महिन्यांत वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या सव्वा लाखांहून अधिक नागरिकांवर कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा कारवाईचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून वाहतुकीच्या बेशिस्तीची ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील वाहतुकीसंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. नागपुरात घडलेल्या वाहतूक नियम उल्लंघनाची प्रकरणे, दंडातून प्राप्त झालेला महसूल, सायलेन्स झोनमध्ये झालेली कारवाई इत्यादीबाबत त्यांच्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. १ जानेवारी २०१८ ते ३० जून २०१८ या कालावधीत नागपूर शहरात वाहतुकीचे नियम तोडणाºया एकूण १ लाख ३३ हजार ५४२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. यात अतिवेगाने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलणे, हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे तसेच ‘ट्रिपलसीट’ वाहन चालविणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
सिग्नल तोडणाऱ्या ९ हजार ४७१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या नागरिकांकडून १६ लाख ४० हजार ९०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. तर ‘सीटबेल्ट’ न लावता चारचाकी चालविणाऱ्या ४ हजार ९८ नागरिकांना पकडण्यात आले व त्यांच्याकडून ८ लाख ३ हजार ६०० रुपये वसूल करण्यात आले. मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या ३ हजार ९८६ वाहनचालकांवर कारवाई झाली व त्यांच्याकडून ७ लाख १ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर हेल्मेट न घालणाऱ्या २१ हजार ८७ दुचाकीस्वारांना ७६ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांकडून २ कोटींचा दंड वसूल
सहा महिन्यांच्या कालावधीत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या तब्बल १० हजार २०५ नागरिकांवर कारवाई झाली. या मद्यपींकडून थोडाथोडका नव्हे तर २ कोटी ३० लाख ६६ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ‘सायलेन्स झोन’चे उल्लंघन करणारे अवघे सतराच वाहनचालक सापडले व त्यांना २१ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

आॅटोचालक नियम कधी पाळणार ?
शहरातील विविध भागांमध्ये आॅटोचालकांकडून बेदरकारपणे आॅटो चालविण्यात येतात. शिवाय नियमांचेदेखील मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याची नागरिकांची ओरड असते. नियम न पाळल्याबद्दल १५९६४ आॅटोचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून ३१ लाख ९८ हजार रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले

ट्रक, मोटार, बस जीवघेणे
जानेवारी २०१५ ते जून २०१८ या कालावधीत ट्रक, कार व बसमुळे सर्वाधिक  १६०४ अपघात झाले व यात ४४६ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. ट्रकमुळे  ५६२ अपघात झाले व यात सर्वात जास्त २६३ नागरिकांचा हकनाक बळी गेला.

गुन्हा                        प्रकरणे            दंड (रुपयांमध्ये)
अतिवेग                    २१                २१,७००
सिग्नल तोडणे           ९,४७१          १६,४०,९००
मोबाईलवर बोलणे    ३,९८६          ७,०१,१००
हेल्मेट न घालणे        २१,०८७         ७६,३३,५००
सिटबेल्ट                  ४,०९८            ८,०३,६००
ट्रीपलसीट               ३,६७९            ६,२४,८७०
सायलेन्स झोन           १७                २१,४००
ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह     १०,२०५            २,३०,६६,४५०

ट्रक, बस, मोटारीमुळे झालेले मृत्यू (२०१५ ते जून २०१८)
वाहन            अपघात            मृत्यू
ट्रक            ५६२                २६३
मोटार        ९०१                १२६
बस            १४१                ५७

Web Title: Nagpur Traffic Police's 'Hunter' on indiscipline vehicles riders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.