नागपुरात दोन तासात तीन एटीएम फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:33 AM2018-06-27T00:33:23+5:302018-06-27T00:36:13+5:30

सोमवारी मध्यरात्री उत्तर नागपुरातील एटीएम फोडून चोरट्यांनी ५५ लाख रुपये लुटून नेले. पहाटे २ ते ४ अशा अवघ्या दोन तासात लुटारूंनी तीन एटीएम फोडले. मंगळवारी सकाळी ही घटना उघड झाल्याने शहरात खळबळ उडाली.

In Nagpur in two hour three ATMs were smashed | नागपुरात दोन तासात तीन एटीएम फोडले

नागपुरात दोन तासात तीन एटीएम फोडले

googlenewsNext
ठळक मुद्दे५५ लाख रुपये लंपास : बँकिंग वर्तुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ (एमएच १२/ ८९१२) मध्ये आलेल्या लुटारूंनी पॉवरग्रीड चौकाजवळच्या स्टेट बँकेच्या एटीएमवर धडक दिली. पहाटे २ च्या सुमारास एटीएममध्ये शिरलेल्या या लुटारूंनी गॅस कटरसह अन्य हत्यारांचा वापर करून २० मिनिटात दोन मशीन फोडल्या. तेथून त्यांनी ११लाख, ३५ हजार, ७०० रुपये लुटले. त्यानंतर हे लुटारू एसबीआयच्याच पाटणकर दुसऱ्या एका एटीएममध्ये पोहचले. तेथून चोरट्यांनी २७ लाख, २४ हजार, ३०० रुपये तसेच तिसºया एटीएममधून १६ लाख, १० हजार, ६०० रुपयांची रोकड लंपास केली. अशा प्रकारे तीन एटीएममधून चोरट्यांनी ५४ लाख, ७० हजार ६०० रुपयांची रोकड लंपास केली. मंगळवारी सकाळी एटीएम फोडण्याच्या या घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. बँक व्यवस्थापक सुधीर बाबूराव माटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
आंतरराज्यीय गुन्हेगार
एटीएम मशीन फोडून रोकड लंपास करणाऱ्या टोळ्या दक्षिण भारत तसेच उत्तर भारतात आहे. गेल्या वर्षी प्रतापनगर, एमआयडीसीतील एटीएम फोडून या टोळ्यांनी अशाच प्रकारे लाखो रुपये लुटून नेले होते.या टोळ्या एवढ्या सराईत आहेत की एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या आपले चेहरे दिसणार नाही, याची पुरेपूर काळजीघेतात. त्यांनी वापरलेली कारचा नंबरही बनावट असावा, असा संशय आहे. 

Web Title: In Nagpur in two hour three ATMs were smashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.