नागपुरात विद्यार्थ्यासह दोघांनी लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 07:25 PM2020-06-25T19:25:52+5:302020-06-25T20:02:22+5:30

जरीपटक्यातील एका विद्यार्थ्यासह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी २ ते ४.३० या अडीच तासात या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या.

In Nagpur, the two, including a student, hanged themselves | नागपुरात विद्यार्थ्यासह दोघांनी लावला गळफास

नागपुरात विद्यार्थ्यासह दोघांनी लावला गळफास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटक्यातील एका विद्यार्थ्यासह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी २ ते ४.३० या अडीच तासात या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या.
जरीपटक्यातील हेमू कॉलनी चौकातील नयनकुमार इंद्रकुमार मगनानी या १४ वर्षाच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नयनकुमार हा नववीचा विद्यार्थी होता. घरगुती कारणामुळे त्याने आत्महत्या केल्याचे पोलीस सांगतात. या आत्महत्येमागे मोबाईल गेम कारणीभूत आहे की आणखी दुसरे कोणते कारण त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
अशाच प्रकारे जरीपटक्यातील एमआयजी कॉलनीत राहणारे अमर महादेव मेश्राम (वय ४१) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मेश्राम यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

किरकोळ वाद जीवघेणा ठरला
 बहीण-भावात वाद झाला अन् रागाच्या भरात भावाने गळफास लावून आत्महत्या केली. जरीपटक्यात बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
जरीपटक्यातील हेमू कॉलनी चौकातील नयनकुमार इंद्रकुमार मगनानी या १४ वर्षाच्या मुलाचा त्याच्या लहान बहिणीसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात नयनकुमार याने गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नयनकुमार हा नववीचा विद्यार्थी होता. त्याच्या वडिलांचे जनरल स्टोअर आहे. किरकोळ कारणामुळे घडलेल्या या आत्महत्येच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या आत्महत्येच्या घटनेमागे आणखी काही कारण आहे का, मोबाईल गेम वगैरे कारणीभूत आहे का त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: In Nagpur, the two, including a student, hanged themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.