नागपूर विद्यापीठ : १२९ परीक्षा परत ‘पोस्टपोन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:26 AM2018-04-04T00:26:08+5:302018-04-04T00:26:34+5:30
१०५ व्या दीक्षांत समारंभामुळे विद्यापीठाच्या १२९ परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्यात आल्या व २४ मार्च रोजी होणारे सर्व पेपर आता ८ एप्रिल रोजी नियोजित करण्यात आले. परंतु ८ एप्रिल रोजी नेमकी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी प्रवेशपरीक्षा ‘जेईई-मेन्स’ आयोजित करण्यात आली असल्यामुळे विद्यापीठाने या परीक्षा परत पुढे ढकलल्या आहेत. यासंदर्भात विद्यापीठाने संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक जारी केले असून ९, १०,११,१३ व १५ एप्रिल रोजी संबंधित पेपर होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १०५ व्या दीक्षांत समारंभामुळे विद्यापीठाच्या १२९ परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्यात आल्या व २४ मार्च रोजी होणारे सर्व पेपर आता ८ एप्रिल रोजी नियोजित करण्यात आले. परंतु ८ एप्रिल रोजी नेमकी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी प्रवेशपरीक्षा ‘जेईई-मेन्स’ आयोजित करण्यात आली असल्यामुळे विद्यापीठाने या परीक्षा परत पुढे ढकलल्या आहेत. यासंदर्भात विद्यापीठाने संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक जारी केले असून ९, १०,११,१३ व १५ एप्रिल रोजी संबंधित पेपर होणार आहेत.
‘जेईई-मेन्स’च्या ‘आॅफलाईन’ परीक्षेसाठी नागपुरात परीक्षा केंद्र असतात. या परीक्षेला मोठ्या प्रमाणात नागपूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील विद्यार्थी समाविष्ट असतात. सोबतच मध्य प्रदेश व छत्तीसगड येथूनदेखील विद्यार्थी येथे परीक्षा देण्यासाठी येतात. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्या जास्त असते. त्यामुळेच ‘सीबीएसई’तर्फे संलग्नित शाळांसोबतच अनेक महाविद्यालयांतदेखील ही परीक्षा घेण्यात येते व परीक्षा केंद्र अगोदरपासूनच निर्धारित करण्यात येतात. यात विद्यापीठाच्या काही परीक्षा केंद्रांचादेखील समावेश आहे. त्यामुळे विद्यापीठाने ८ एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षा दुसºया अन्य तारखेला घेण्याचा निर्णय घेतला. ७३ विषयांच्या परीक्षा या ९ एप्रिल रोजी होणार आहेत तर २८ विषयांच्या परीक्षा १५ एप्रिल रोजी होणार आहेत. विद्यार्थ्यांची मागणी आणि परीक्षा केंद्रांवरील स्थिती लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांनी दिली.