नागपूर विद्यापीठ : १८ टक्के विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 08:52 PM2020-10-08T20:52:53+5:302020-10-08T20:57:00+5:30

Nagpur University, Online Examराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात झाली. इतर विद्यापीठांप्रमाणे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचा फज्जा तर उडाला नाही. मात्र विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.

Nagpur University: 18% students deprived from exams | नागपूर विद्यापीठ : १८ टक्के विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

नागपूर विद्यापीठ : १८ टक्के विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

Next
ठळक मुद्दे‘ओटीपी’चा गोंधळ, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात झाली. इतर विद्यापीठांप्रमाणे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचा फज्जा तर उडाला नाही. मात्र विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांच्या मोबाईल क्रमांकावर ‘ओटीपी’च आला नाही तर अनेकांच्या मोबाईलवरून पेपरच ‘सबमिट’ होत नव्हता. एकूणच पहिला दिवस हा परीक्षांच्या हिशेबाने ‘फिफ्टी-फिफ्टी’ असाच राहिला. सुमारे १८ टक्के विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. आता या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होण्याची शक्यता असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे
नागपूर विद्यापीठाने परीक्षांसाठी ‘आरटीएमएनयू परीक्षा’ हे ‘मोबाईल अ‍ॅप’ विकसित केले होते. गुरुवारी सकाळपासूनच परीक्षांना सुरुवात झाली. पहिला टप्पा काहीसा सुरळीतच पार पडला. मात्र दुपारी दीडनंतरच्या परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. अनेकांच्या मोबाईल क्रमांकावर ‘ओटीपी’च आला नव्हता. तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्रश्नच येत नव्हते. शासकीय विज्ञान संस्थेतील काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर बºयाच वेळाने प्रश्नपत्रिका आली आणि काही वेळातच सर्व प्रश्न ‘समबिट’ झाल्याचीदेखील सूचना आली. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले होते.
पहिल्या दिवशी चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील सुमारे १८ टक्के विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक समस्यांमुळे परीक्षा देता आली नाही.

बीएससीमध्ये सर्वाधिक समस्या
दुपारी दीड वाजता बीएससीचा पेपर झाला. त्याला एकूण १ हजार ६८४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३१६ विद्यार्थ्यांना अडचण आली व त्यांना पेपर देता आला नाही. तर वाणिज्यच्या सहा विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही.

‘शून्य’ उत्तरांनी वाढविले ‘टेन्शन’
काही विद्यार्थ्यांना वेगळीच समस्या जाणवली. ५० पैकी २५ प्रश्न सोडविणे अनिवार्य होते. विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न सोडविले. मात्र प्रत्यक्षात ‘सबमिट’चे बटण दाबल्यानंतर ५० पैकी एकही प्रश्न सोडविला नसल्याचे विद्यार्थ्यांना संदेश आले. हे विद्यार्थी तर प्रचंड तणावात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न विद्यापीठाला मिळाले आहेत. ‘डाटा’ वेळेत ‘सिंक’ न झाल्याने विद्यार्थ्यांना ‘शून्य’ उत्तरांचे संदेश आले असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.

परीक्षेतील त्रुटींवर ‘अभाविप’ आक्रमक
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षांमध्ये पहिल्याच दिवशी शेकडो विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळ््यांचा सामना करावा लागला. याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणी लवकरात लवकर सोडविल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभाविपतर्फे देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना लॉगिन आयडी टाकायला त्रास झाला. तसेच अनेकांना ‘ओटीपी’च मिळाला नाही. तांत्रिक अडचणींमुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी विद्यापीठाने त्वरित मार्गदर्शिका जारी करावी. तसेच ‘हेल्पलाईन’ क्रमांकदेखील त्वरित ‘अ‍ॅक्टिव्ह’ करण्यात यावा अशी मागणी अभाविपने केली आहे.

Web Title: Nagpur University: 18% students deprived from exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.