नागपूर विद्यापीठ : ४४ टक्के पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 01:36 AM2018-11-04T01:36:57+5:302018-11-04T01:37:37+5:30

राज्य शासनाने जुन्या आकृतिबंधाप्रमाणे पदभरती करण्याचे आश्वासन दिल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रिक्त पदांचा अनुशेष दूर होण्याची चिन्हे आहेत. मात्र विद्यापीठातील नेमक्या किती पदांवर भरती होईल, हे शासनाने स्पष्ट केलेले नाही. नागपूर विद्यापीठात सद्यस्थितीत प्राध्यापकांची ४४ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे शासनाच्या पुढील निर्देशांकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Nagpur University: 44% vacant posts | नागपूर विद्यापीठ : ४४ टक्के पदे रिक्त

नागपूर विद्यापीठ : ४४ टक्के पदे रिक्त

Next
ठळक मुद्देविद्यापीठात किती पदांची भरती होणार ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाने जुन्या आकृतिबंधाप्रमाणे पदभरती करण्याचे आश्वासन दिल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रिक्त पदांचा अनुशेष दूर होण्याची चिन्हे आहेत. मात्र विद्यापीठातील नेमक्या किती पदांवर भरती होईल, हे शासनाने स्पष्ट केलेले नाही. नागपूर विद्यापीठात सद्यस्थितीत प्राध्यापकांची ४४ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे शासनाच्या पुढील निर्देशांकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातील प्राध्यापकांवर कामाचा ताण वाढला आहे. प्रत्येक प्राध्यापकावर दोन जणांच्या कामाचे ओझे आहे. नागपूर विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची पदभरती झालेली नाही. दुसरीकडे दरवर्षी विविध विभागांतील प्राध्यापक सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यातील गुणोत्तर असंतुलित झाले आहेत. याचा फटका विभागांमधील शैक्षणिक व संशोधन कार्याला बसतो आहे. नागपूर विद्यापीठात ३३४ प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४४.९१ टक्के म्हणजे १५१ पदे रिक्त आहेत. केवळ १८३ प्राध्यापक कार्यरत आहेत. यात २२ ‘प्रोफेसर’, ४२ सहयोगी प्राध्यापक व ११९ सहायक प्राध्यापकांचा समावेश आहे.
मुंबई येथे राज्यातील सर्व अकृषक विद्यापीठांच्या कुलसचिवांची बैठकीत पदभरतीबाबत सकारात्मक आश्वासन राज्य शासनातर्फे देण्यात आले. नवीन आकृतिबंध तयार करून पदभरती घेतल्यास त्यामध्ये दोन वर्षे निघून जातील. त्यामुळे जुन्या आकृतिबंधाप्रमाणे पदभरती घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र सर्व रिक्त पदांवर भरती होणार की त्यातील काही टक्के पद भरली जातील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्यापीठाने २०११-१२ मध्ये आकृतिबंध तयार केला होता. यातील किमान ५० टक्के तरी पदांना मान्यता मिळेल, अशी शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Nagpur University: 44% vacant posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.