नागपूर विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकांमध्ये शिक्षण मंचाला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 02:55 PM2017-11-28T14:55:50+5:302017-11-28T14:56:49+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांमध्ये मोठे उलटफेर होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. मागील वेळेप्रमाणे यंदादेखील डॉ. बबन तायवाडे यांच्या नेतृत्वातील ‘यंग टीचर्स असोसिएशन’चा दबदबा कायम राहिला.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांमध्ये मोठे उलटफेर होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. मागील वेळेप्रमाणे यंदादेखील डॉ. बबन तायवाडे यांच्या नेतृत्वातील ‘यंग टीचर्स असोसिएशन’चा दबदबा कायम राहिला. ‘सेक्युलर पॅनल’नेदेखील चांगली कामगिरी केली. संपूर्ण ताकदीने निवडणुकांत उतरलेल्या शिक्षण मंचाला मात्र अपयशाचा सामना करावा लागला.
निकाल मान्य : कल्पना पांडे
यंदाच्या निवडणूकांमध्ये गमविण्यासारखे आमच्याकडे काहीच नव्हते. आम्ही आपल्या परिने पुर्ण तयारी केली होती. मात्र मत मिळू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला निकाल मान्य आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉ.कल्पना पांडे यांनी केले.
विजयाची खात्री होतीच : डॉ.बबन तायवाडे
विद्यापीठात आम्ही जी कामे केली आहेत त्याची पावतीच आज मतदारांनी दिली आहे. शिक्षकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच काम करतो. त्यामुळे विजयाची खात्री होतीच, असे मत यंग टीचर्स असोसिशनचे अध्यक्ष डॉ.बबन तायवाडे यांनी व्यक्त केले.
अपेक्षेप्रमाणेच निकाल
शिक्षण मंचाने आमच्या गटाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिकूल परिस्थितीतदेखील आमचा निर्धार कायम होता. आमचा मतदारांवर विश्वास होता. अद्याप पूर्ण निकाल हाती यायचे आहेत. मात्र सध्या तरी अपेक्षेप्रमाणे कामगिरी दिसून येत आहे, असे मत ‘सेक्युलर पॅनल’ची धुरा सांभाळणारे अॅड.अभिजित वंजारी यांनी व्यक्त केले.
असे आहेत विजयी उमेदवार
विधिसभा ( प्राचार्य गट )
प्रवर्ग नाव पॅनल
खुला नरेंद्रसिंह दीक्षित यंग टीचर्स
खुला मृत्युंजय सिंह सेक्युलर
खुला विवेक नानोटी सेक्युलर
खुला ऊर्मिला डबीर शिक्षण मंच
खुला संजय धनवटे यंग टीचर्स
एससी प्रल्हाद पवार यंग टीचर्स
एसटी चेतनकुमार मसराम सेक्युलर
ओबीसी विनोद गावंडे यंग टीचर्स
महिला शरयू तायवाडे यंग टीचर्स
विद्यापीठ शिक्षक
खुला सुरेश झाडे यंग टीचर्स
एससी ओमप्रकाश चिमणकर सेक्युलर
महिला ममता लांजेवार यंग टीचर्स
व्यवस्थापन प्रतिनिधी
खुला बबन तायवाडे यंग टीचर्स
खुला दुष्यंत चतुर्वेदी सेक्युलर
खुला किशोर उमाठे सेक्युलर
खुला राजेश भोयर शिक्षण मंच
महिला स्मिता वंजारी सेक्युलर