नागपूर विद्यापीठ : परीक्षा भवनातील कॉफी ‘कडू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:15 PM2019-06-24T22:15:09+5:302019-06-24T22:17:11+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनातील गडबड व गोंधळ नेहमीच समोर येत असतात. मात्र आता परीक्षा भवनाच्या परिसरातील उपाहारगृहामध्ये सुरू असलेला मनमर्जी कारभार चव्हाट्यावर आला आहे. या उपाहारगृहातील नियोजित दरपत्रकात विनापरवानगी बदल करण्यात आला असून खाद्यपदार्थ जास्त दराने विकण्यात येत आहेत. विशेषत: येथील कॉफीचे दर तर कुठलीही सूचना न देता ८० टक्क्यांनी वाढविण्यात आले व तसे देयकदेखील विद्यापीठाला पाठविण्यात आले. यासंदर्भात ‘एनएसयूआय’ने प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्यासमोर मांडला आहे.

Nagpur University: The coffee in the examination Bhavan 'Kadu' | नागपूर विद्यापीठ : परीक्षा भवनातील कॉफी ‘कडू’

नागपूर विद्यापीठ : परीक्षा भवनातील कॉफी ‘कडू’

Next
ठळक मुद्देउपाहारगृहात मनमर्जी दर, नियोजित दरपत्रकात विनापरवानगी बदल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनातील गडबड व गोंधळ नेहमीच समोर येत असतात. मात्र आता परीक्षा भवनाच्या परिसरातील उपाहारगृहामध्ये सुरू असलेला मनमर्जी कारभार चव्हाट्यावर आला आहे. या उपाहारगृहातील नियोजित दरपत्रकात विनापरवानगी बदल करण्यात आला असून खाद्यपदार्थ जास्त दराने विकण्यात येत आहेत. विशेषत: येथील कॉफीचे दर तर कुठलीही सूचना न देता ८० टक्क्यांनी वाढविण्यात आले व तसे देयकदेखील विद्यापीठाला पाठविण्यात आले. यासंदर्भात ‘एनएसयूआय’ने प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्यासमोर मांडला आहे.
नागपूर विद्यापीठाने हे उपाहारगृह चालविण्याचे कंत्राट दिलेले आहे. या उपाहारगृहातील खाद्यपदार्थ तसेच चहा-कॉफी यांचे दर निश्चित करून देण्यात आले आहेत. परीक्षा विभागाचे कर्मचारी-अधिकारी येथूनच चहा-नाश्ता मागवितात. या उपाहारगृहात कॉफीचे दर १० रुपये इतके होते. २० डिसेंबर २०१८ पर्यंत हेच दर होते. गोपनीय विभागाच्या सहायक कुलसचिवांच्या नावे काढलेल्या देयकामध्ये तसा स्पष्ट उल्लेखदेखील आहे. मात्र २७ मार्च २०१९ मधील देयकात कॉफीचे दर १८ रुपये लावण्यात आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे उपाहारगृहाच्या ‘मेन्यू’मध्ये कॉफीचे दर १० रुपये इतकेच नमूद आहेत. सोबतच समोसा, कचोरीसह इतर खाद्यपदार्थांचे दरदेखील वाढविण्यात आले आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब का आली नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
उपाहारगृहातील हा प्रकार बेकायदेशीर असून त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ‘एनएसयूआय’ने केली आहे. यासंदर्भात संघटनेतर्फे विरोध प्रदर्शन करण्यात आले. तसेच प्र-कुलगुरूंना निवेदनदेखील सादर करण्यात आले. यावेळी प्रदेश महासचिव अजित सिंह, राष्ट्रीय प्रतिनिधी आमिर नुरी, जिल्हाध्यक्ष आशिष मंडपे यांच्यासह शादाब सोफी, प्रतीक कोल्हे, प्रणय ठाकूर, फरमान अली, प्रज्योत पंखिडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Nagpur University: The coffee in the examination Bhavan 'Kadu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.