नागपूर विद्यापीठ; परीक्षकांच्या मानधनाचे दस्तावेज गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 10:50 AM2019-07-24T10:50:09+5:302019-07-24T10:51:22+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गोपनीय शाखेतून परीक्षकांच्या मानधनासंदर्भातील दस्तावेज गायब झाले आहेत.

Nagpur University; Document of examiner disappears! | नागपूर विद्यापीठ; परीक्षकांच्या मानधनाचे दस्तावेज गायब!

नागपूर विद्यापीठ; परीक्षकांच्या मानधनाचे दस्तावेज गायब!

Next
ठळक मुद्देघोटाळ्याचा संशयअधिकारी म्हणतात घेतला जातोय शोध

आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गोपनीय शाखेतून परीक्षकांच्या मानधनासंदर्भातील दस्तावेज गायब झाले आहेत. किती परीक्षकांना मानधन दिले व कितींना देणे शिल्लक आहे, याची माहिती सुद्धा अधिकाऱ्यांजवळ नाही.
‘लोकमत’ने यासंदर्भात गोपनीय शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांना यासंदर्भात विचारणा केली. अधिकाºयांचे म्हणणे आहे की, आता आम्ही माहिती घेत आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून अधिकाºयांकडून हेच उत्तर दिले जात आहे. मुख्य म्हणजे अधिकाºयांकडे परीक्षकांचा रेकॉर्ड असतो. किती परीक्षकांना मानधन दिले आणि कुणाला दिले नाही, याची माहिती असते. ही माहिती आॅडिट करताना सादर करावी लागते. मात्र अधिकाºयांना दोन महिन्यापासून मानधनासंदर्भातले दस्तावेज मिळत नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे परीक्षकांच्या मानधनासंदर्भात घोटाळा तर झाला नाही ना, असाही संशय बळावला आहे.
या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान तामिळनाडू येथील एका विद्यापीठाच्या सहा. प्राध्यापकाच्या प्रकारणाचा खुलासा झाला आहे. सूत्रांच्या मते या प्राध्यापकाने विद्यापीठाच्या एका परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार केली होती. प्रश्नपत्रिका पाठविण्याबरोबरच त्यांनी मानधन मिळावे म्हणून बँकेची माहितीही पाठविली होती. परंतु तीन वर्षापासून त्यांना मानधनाची रक्कम दिली गेली नाही.
२०१६ मध्ये परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणाºया एका वरिष्ठ प्राध्यापकालाही विद्यापीठाने मानधन दिले नाही. तामिळनाडूच्या या प्राध्यापकाने मानधन न मिळाल्यामुळे गोपनीय शाखेतून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगण्यात आले की, मानधन देण्यात आले आहे. कुणी तरी मानधन घेऊन गेले आहे.
परंतु मानधन कधी आणि कुणाला दिले गेले याची माहिती विभागाकडे नाही आणि अधिकारीही टोलवाटोलवीचे उत्तर देत आहे.

परीक्षकांनी संपर्क करावा
यासंदर्भात विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे निदेशक डॉ. अनिल हिरेखण यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, संबंधित परीक्षकांनी त्यांच्याशी संपर्क करावा. गोपनीय शाखेजवळ माहिती नसल्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की विभागाला विचारण्याची गरज नाही. ज्यांना मानधन मिळाले नाही, अशा परीक्षकांनी त्यांच्याशी संपर्क करावा, चर्चेनंतर प्रकरणाचा निपटारा करण्यात येईल.

Web Title: Nagpur University; Document of examiner disappears!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.