नागपूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 10:16 PM2020-09-24T22:16:20+5:302020-09-24T22:18:42+5:30
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी या मागणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी या मागणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातीलकर्मचारी व अधिकाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले. कर्मचारी कामावर आले मात्र ते स्वाक्षरी करून आंदोलनाच्या ठिकाणी एकत्रित आले. यावेळी शासनाच्या दुजाभाव धोरणाचा संघटनांकडून निषेध करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन करण्यात आले. २४ सप्टेंबरला कर्मचारी कामावर आले. मात्र, ते स्वाक्षरी करून आंदोलनाच्या ठिकाणी एकत्रित जमले. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाने अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामधून वगळल्याने राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आवाज बुलंद केला आहे. वेतन आयोगासाठी राज्यभर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यावर शासनाने यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वाासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, शासनाकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप संघटनांकडून लावण्यात आला. मागण्या पूर्ण न झाल्यास १ ऑक्टोबरपासून काम बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफिसर्स फोरम, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षकेतर सेवक संघ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ बहुजन कर्मचारी संघटना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कर्मचारी संघ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिकारी फोरम या संघटना यात सहभागी झाल्या होत्या. डॉ. पुरण मेश्राम, डॉ. अनिल हिरेखण, प्रवीण गोतमारे, मनीष झोडापे, दिनेश दखने, बाळू शेळके, मारोती बोरकर, सुधाकर पाटील, राजेंद्र पाठक, प्रदीप मसराम, चंद्रमणी सहारे, डॉ. वंदना खेडीकर, सुचित्रा मेंढे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. शिवाय कृती समितीच्या सदस्यांनी विभागीय उच्चशिक्षण सहसंचालकांचीदेखील भेट घेतली.