नागपूर विद्यापीठ : एमआयएसला डेटा देण्यास नकार, नोंदणीही नाही
By Admin | Published: July 3, 2016 07:12 PM2016-07-03T19:12:47+5:302016-07-03T19:12:47+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांकडून राज्य शासनाच्या एमआयएसला (मॅनेजमेन्ट आॅफ इन्फॉर्मेशन सिस्टम) माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांकडून राज्य शासनाच्या एमआयएसला (मॅनेजमेन्ट आॅफ इन्फॉर्मेशन सिस्टम) माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. विद्यापीठातील ५७ महाविद्यालयांनी अद्याप ह्यएमआयएसह्णला माहिती देणे तर दूरच, पण साधी नोंदणीदेखील केलेली नाही. वारंवार पत्र पाठवून आणि इशारे देऊनदेखील महाविद्यालयांनी ही बाब गंभीरतेने घेतलेली नाही.
उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या खालावलेल्या स्तराची कारणे शोधण्यासाठी राज्य शासनातर्फे ह्यएमआयएसह्णच्या माध्यमातून माहिती गोळा करण्यात येते. या माहितीमध्ये महाविद्यालयांमधील शिक्षक, विद्यार्थी, अभ्यासक्रम, परीक्षांचे निकाल, शिक्षणावरील कर्ज, पायाभूत सुविधा इत्यादी मुद्यांवर याअंतर्गत माहिती मागविण्यात येते.
२०१५-१६ या वर्षासाठी ह्यएमआयएसह्णअंतर्गत सर्व विद्यापीठांकडून माहिती मागविण्यात आली होती. नागपूर विद्यापीठाचे नोडल अधिकारी डॉ.धर्मेश धवनकर यांनी महाविद्यालयांना पत्र पाठवून ह्यडेटाह्ण मागविला होता. यासंबंधात जिल्हास्तरावर कार्यशाळेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. परंतु वारंवार सूचना देऊनदेखील माहिती देण्यास महाविद्यालयांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. ५७ महाविद्यालयांनी ह्यएमआयएसह्णसाठी नोंदणीच केलेली नाही.
नागपूर विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयांमध्ये आवश्यक त्या सुविधाच नाही. आवश्यक संख्येत शिक्षक नसून पायाभूत सुविधांची बोंबच आहे. जर खरी माहिती दिली तर महाविद्यालयावर संकट येऊ शकते या भीतीतून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.