नागपूर विद्यापीठ : तासिका तत्त्वारील प्राध्यापकांना मानधन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 08:00 PM2020-05-05T20:00:48+5:302020-05-05T20:03:56+5:30

लॉकडाऊनमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संचालित महाविद्यालयातील वर्गदेखील मार्च महिन्यापासून बंदच आहेत. यामुळे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मानधन मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु या प्राध्यापकांना मार्च व एप्रिल महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.

Nagpur University: Professors of Tasika principle will get honorarium | नागपूर विद्यापीठ : तासिका तत्त्वारील प्राध्यापकांना मानधन मिळणार

नागपूर विद्यापीठ : तासिका तत्त्वारील प्राध्यापकांना मानधन मिळणार

Next
ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेचा निर्णय


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संचालित महाविद्यालयातील वर्गदेखील मार्च महिन्यापासून बंदच आहेत. यामुळे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मानधन मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु या प्राध्यापकांना मार्च व एप्रिल महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.

नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संचालित महाविद्यालयात पूर्णकालीन प्राध्यापकांची अर्ध्याहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक विषय शिकविण्यासाठी तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. प्रत्येक सत्रानंतर त्यांना मानधन प्रदान करण्यात येते. मागील सत्र हे डिसेंबर महिन्यात संपले. त्यानंतर लगेच प्राध्यापकांना मानधन मिळणे अपेक्षित होते. मात्र, तीन महिन्यावर कालावधी झाला तरीही ते जमा झाले नाही. टाळेबंदीमुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात वर्गच झाले नाहीत. त्यामुळे प्राध्यापकांना मानधनापासून वंचित राहावे लागणार असेच चित्र होते. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा झाली व वरील निर्णय घेण्यात आला. अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी यांनी हा विषय लावून धरला होता.

Web Title: Nagpur University: Professors of Tasika principle will get honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.