नागपूर विद्यापीठाची निकाल ‘एक्स्प्रेस’ जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:50 AM2019-05-16T10:50:29+5:302019-05-16T10:51:38+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यंदादेखील वेगवान निकालांची परंपरा कायम ठेवली आहे. उन्हाळी परीक्षांमधील ३०० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यंदादेखील वेगवान निकालांची परंपरा कायम ठेवली आहे. उन्हाळी परीक्षांमधील ३०० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. विशेष म्हणजे उन्हाळी परीक्षांचा टप्पा अद्यापदेखील सुरूच आहे. सर्व निकाल जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत जाहीर होतील, असा दावा परीक्षा विभागाकडून करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उन्हाळ्यात विद्यापीठाकडून सुमारे १ हजार २५० अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येत आहेत.
बुधवारपर्यंत परीक्षा विभागाने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील जवळपास सर्व निकाल घोषित केले आहेत.
२० मे नंतर तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील परीक्षांचे निकाल येण्यास सुरुवात होईल. विद्यापीठ परीक्षांचा पाचवा टप्पा १० मे पासून सुरू झाला आहे व या परीक्षांचे निकाल २० जुलैपर्यंत पूर्णत: लागतील. तिसऱ्या टप्प्यातील परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन वेगाने सुरू आहे. लोकसभा निवडणुकांमुळे ३०० हून अधिक विषयांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्यादेखील झाल्या आहेत. मात्र यामुळे अपेक्षेप्रमाणे वेगाने निकाल लागू शकलेले नाहीत. मेच्या दुसºया आठवड्यात ७०० हून अधिक निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. यंदा उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनदेखील वेगाने होत असून प्राध्यापकांकडूनदेखील पूर्ण सहकार्य मिळत आहे. ३१ मे पर्यंत ८०० हून अधिक परीक्षांचे निकाल घोषित होतील, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.