नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा २९ जूनपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 11:14 PM2021-05-20T23:14:13+5:302021-05-20T23:15:43+5:30
Nagpur University Summer Examination राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षांबाबत अखेर प्रशासनाने निर्णय घेतला आहे. २९ जूनपासून उन्हाळी परीक्षांना सुरुवात होणार आहे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना १९ जुलैपासून सुरुवात होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षांबाबत अखेर प्रशासनाने निर्णय घेतला आहे. २९ जूनपासून उन्हाळी परीक्षांना सुरुवात होणार आहे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना १९ जुलैपासून सुरुवात होणार आहे.
विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने पुढे ढकलले होते. हिवाळी परीक्षा आटोपल्यानंतर उन्हाळी परीक्षा घेण्याचा विद्यापीठाचा मानस होता. कोरोनाची स्थिती पाहता यासाठी टास्कफोर्स स्थापन करण्यात आली होती. या टास्कफोर्सच्या बैठकीत उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या उन्हाळी परीक्षांना २९ जूनपासून सुरुवात होणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा १२ जुलैपासून सुरुवात होणार असून, १९ ते २६ जुलैदरम्यान लेखी परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे.
तीन वर्षीय अभ्यासक्रमातील सहावे सत्र, चार वर्षीय अभ्यासक्रमातील आठवे आणि दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्याक्रमातील चौथे सत्राची परीक्षा विद्यापीठ स्तरावर ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे ठरले आहे.