नागपूर विद्यापीठ : ‘व्यवस्थापन’वर कोण, शिक्षण मंच की महाआघाडी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:59 PM2018-07-23T23:59:32+5:302018-07-24T00:00:35+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रलंबित व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुका अखेर मंगळवारी होणार आहेत. शिक्षण मंच आणि ‘यंग टीचर्स असोसिएशन’, ‘सेक्युलर पॅनल’ व विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद या तीन संघटनांच्या महाआघाडीमध्ये लढत होणार आहे. निवडणूक आठ जागांसाठी होणार असून चार जागांवरील उमेदवार थेट व्यवस्थापन परिषदेत गेले असल्याने उर्वरित जागांसाठीच जोरदार संग्राम पहायला मिळणार आहे हे विशेष.

Nagpur University: Who is on the 'management', education forum or great front? | नागपूर विद्यापीठ : ‘व्यवस्थापन’वर कोण, शिक्षण मंच की महाआघाडी ?

नागपूर विद्यापीठ : ‘व्यवस्थापन’वर कोण, शिक्षण मंच की महाआघाडी ?

Next
ठळक मुद्देविधिसभेच्या बैठकीत मंगळवारी होणार निवडणुका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रलंबित व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुका अखेर मंगळवारी होणार आहेत. शिक्षण मंच आणि ‘यंग टीचर्स असोसिएशन’, ‘सेक्युलर पॅनल’ व विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद या तीन संघटनांच्या महाआघाडीमध्ये लढत होणार आहे. निवडणूक आठ जागांसाठी होणार असून चार जागांवरील उमेदवार थेट व्यवस्थापन परिषदेत गेले असल्याने उर्वरित जागांसाठीच जोरदार संग्राम पहायला मिळणार आहे हे विशेष. आपल्या उमेदवारांच्या निवडीसाठी सर्वच संघटनांनी कंबर कसली असून अखेरच्या क्षणापर्यंत ‘संपर्क’ मोहीम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नियोजित वेळापत्रकानुसार २८ फेब्रुवारी रोजी व्यवस्थापन परिषदेची निवडणूक होणार होती. मात्र निवडणुकींचा वाद न्यायालयात गेला व त्यानंतर प्रक्रिया थंडबस्त्यात पडली. न्यायालयाच्या निर्देशानंतर आता मंगळवार २४ जुलै रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.
विधिसभेच्या निवडणुकांमधील निकालांच्या आधारावर एकूण आठ सदस्य तेथून निवडून जाणार आहेत. अध्यापक गटातून ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेले डॉ.नितीन कोंगरे, प्राचार्य गटातून ‘व्हीजेएनटी’ प्रवर्गातून विजयी झालेले डॉ.चंदनसिंग रोटेले, व्यवस्थापन प्रतिनिधी गटातील अनुसूचित जाती प्रवर्गातून विजयी झालेले डॉ.सुधीर फुलझेले व पदवीधर गटातून ‘एससी’ प्रवर्गातील विजयी उमेदवार दिनेश शेराम हे व्यवस्थापन परिषदेवर थेट जाणार आहेत. विधिसभेतून उर्वरित चार जागांसाठी जोरदार चुरस राहणार आहे.
महाआघाडीतर्फे शिक्षक गटात डॉ. प्रदीप बुटे, प्राचार्य गटात डॉ. मृत्यूंजयसिंग ठाकूर, व्यवस्थापन गटात किशोर उमाठे तर पदवीधर गटात अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विद्यापीठ शिक्षण मंचाकडून प्राचार्य गटात डॉ. ऊर्मिला डबीर, शिक्षक गटात डॉ. निरंजन देशकर, व्यवस्थापन गटात डॉ.आर.जी. भोयर तर पदवीधर गटात विष्णू चांगदे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. दोन्ही संघटनांकडून जोरदार तयारी असून मतदारांशी संपर्क साधण्याचे अखेरपर्यंत प्रयत्न सुरू होते.

पदवीधर निवडणुकीतील चुकांपासून शिकवण ?
विधिसभेच्या पदवीधर गटाच्या निवडणुकीत महाआघाडीतील तिन्ही संघटना ‘विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद’ या ‘बॅनर’खाली लढतील, असे ठरले होते. मात्र ‘सेक्युलर’ने अगोदरपासूनच प्रचाराची वेगळी तºहा ठेवली. त्यांच्या दोन उमेदवारांचा प्रचार ‘सेक्युलर पॅनल’च्या नावाखाली सुरू केला. त्यामुळे महाआघाडीत ‘आॅल इज वेल’ नसल्याचे मतदारांच्या लक्षात आले आणि मतपत्रिकेत याचे प्रतिबिंब उमटले होते. यंदा आता हेच चित्र कायम राहते की मागील चुकांपासून शिकवण घेत तिन्ही संघटना शिक्षण मंचविरोधात एकत्र राहतात हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Nagpur University: Who is on the 'management', education forum or great front?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.