नागपूर विद्यापीठाचा प्रताप : परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना केले अनुत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:32 PM2018-10-24T23:32:33+5:302018-10-24T23:34:35+5:30

साधारणत: परीक्षा झाल्यानंतरच विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करण्यात येतात व विद्यार्थी अनुत्तीर्ण आहे की उत्तीर्ण, याचे चित्र स्पष्ट होते. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एक अनोखाच प्रताप केला आहे. वर्ध्यातील एका ‘फार्मसी’ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा विभागाने परीक्षा न घेताच अनुत्तीर्ण घोषित केले. आश्चर्याची बाब म्हणजे मागील एक वर्षापासून या विद्यार्थ्यांची परत परीक्षा घेण्याची तसदीदेखील घेण्यात आलेली नाही. विद्यापीठाच्या विधिसभेच्या बैठकीत याचा बुधवारी खुलासा झाला.

Nagpur University's height: Failed students without taking exams | नागपूर विद्यापीठाचा प्रताप : परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना केले अनुत्तीर्ण

नागपूर विद्यापीठाचा प्रताप : परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना केले अनुत्तीर्ण

Next
ठळक मुद्देकुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीचे गठन

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : साधारणत: परीक्षा झाल्यानंतरच विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करण्यात येतात व विद्यार्थी अनुत्तीर्ण आहे की उत्तीर्ण, याचे चित्र स्पष्ट होते. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एक अनोखाच प्रताप केला आहे. वर्ध्यातील एका ‘फार्मसी’ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा विभागाने परीक्षा न घेताच अनुत्तीर्ण घोषित केले. आश्चर्याची बाब म्हणजे मागील एक वर्षापासून या विद्यार्थ्यांची परत परीक्षा घेण्याची तसदीदेखील घेण्यात आलेली नाही. विद्यापीठाच्या विधिसभेच्या बैठकीत याचा बुधवारी खुलासा झाला.
विधिसभा सदस्य डॉ. केशव मेंढे यांनी ही धक्कादायक बाब सभागृहासमोर आणली. ‘अग्निहोत्री कॉलेज आॅफ फार्मसी’ येथील ‘एमफार्म’च्या चार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या नियमानुसार ‘डेझर्टेशन’ विद्यापीठात जमा केले. नियमानुसार त्यांच्या तपासणीसाठी एका ‘पॅनल’चेदेखील गठन करण्यात आले. मात्र ‘एक्सटर्नल’ परीक्षक मौखिक चाचणी घेण्यासाठी पोहोचलेच नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने कुठल्याही तपासणीविना या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले. डॉ. मेंढे यांनी ही बाब सभागृहासमोर आणल्यानंतर बैठकीत जोरदार गोंधळ झाला. अखेर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र तरीदेखील सदस्य शांत होत नसल्याने अखेर कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली एका चौकशी समितीचे गठन करण्याची घोषणा करण्यात आली. पुढील १० दिवसात ही समिती अहवाल सादर करेल व याच्या आधारावर पुढील पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन यावेळी प्रशासनाकडून देण्यात आले.

Web Title: Nagpur University's height: Failed students without taking exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.