नागपूर विद्यापीठाची ‘आॅनलाईन’ प्रमाणपत्र योजना कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:53 PM2018-07-31T23:53:26+5:302018-07-31T23:55:25+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रमाणपत्र प्रदान करण्याची योजना कागदावरच आहे. यासंबंधात तीन वर्षांअगोदर पुढाकार घेण्यात आला होता. मात्र वास्तवात या योजनेचा काहीच पत्ता नाही. विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांसाठी परीक्षा भवन तसेच वित्त विभागाच्या खिडक्यांवर तासन्तास उभे रहावे लागत आहे. सोबतच परीक्षा भवनात तैनात सुरक्षारक्षकांच्या दुर्व्यवहाराचादेखील त्यांना सामना करावा लागत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे परीक्षा भवनात विद्यार्थ्यांची समस्या ऐकण्यासाठी व सोडविण्यासाठी एकही अधिकारी नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रमाणपत्र प्रदान करण्याची योजना कागदावरच आहे. यासंबंधात तीन वर्षांअगोदर पुढाकार घेण्यात आला होता. मात्र वास्तवात या योजनेचा काहीच पत्ता नाही. विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांसाठी परीक्षा भवन तसेच वित्त विभागाच्या खिडक्यांवर तासन्तास उभे रहावे लागत आहे. सोबतच परीक्षा भवनात तैनात सुरक्षारक्षकांच्या दुर्व्यवहाराचादेखील त्यांना सामना करावा लागत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे परीक्षा भवनात विद्यार्थ्यांची समस्या ऐकण्यासाठी व सोडविण्यासाठी एकही अधिकारी नाही.
विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू होताच विविध प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी येत असतात. विद्यार्थ्यांची पायपीट वाचावी यासाठी आॅनलाईन व्यवस्था सुरू करण्यात येईल, असा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला होता.मात्र प्रत्यक्षात ही व्यवस्था अद्यापही लागू होऊ शकलेली नाही. अगोदर अर्ज घेणे व त्यानंतर शुल्क जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना रांगेत उभे रहावे लागत आहे.
सोबतच त्यांना विद्यापीठाच्या परीक्षा भवनात तैनात सुरक्षा रक्षकांच्या दुर्व्यवहाराचादेखील सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांना व त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांना ओळखपत्र मागितले जाते. जर ते नसेल तर त्यांना परीक्षा भवनात प्रवेशदेखील करता येत नाही. अनेकदा तर ओळखपत्र असूनदेखील विद्यार्थ्यांना आत जाऊ दिले जात नाही.
‘काऊंटर’वर माहितीच मिळत नाही
विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने सुविधा केंद्र सुरू केले आहे. यासाठी खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे. मात्र या कर्मचाºयांकडे अपुरी माहिती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी मनस्ताप होतो.
बसण्याचीदेखील व्यवस्था नाही
परीक्षा भवनात विद्यार्थ्यांसाठी बसण्याची कुठलीही व्यवस्था नाही. त्यांना अक्षरश: जमिनीवर बसून अर्ज भरावे लागतात. विद्यार्थ्यांनी याची तक्रार अधिकाºयांकडे केली. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या माध्यमातून वर्षाला ५४ कोटी रुपये प्राप्त होतात. मात्र तरीदेखील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही.
शिक्षकांनादेखील करण्यात येते अपमानित
विद्यापीठाच्या परीक्षा विभागात दररोज महाविद्यालय व विद्यापीठांचे शिक्षक परीक्षांच्या कामासाठी येतात. मात्र त्यांनादेखील सुरक्षारक्षकांच्या दुर्व्यवहाराचा सामना करावा लागतो. याबाबतीत काही शिक्षकांनी तक्रारदेखील केली. मात्र त्याची दखल अधिकाºयांनी घेतली नाही.
छायाचित्रकाराचा कॅमेरा हिसकला
विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’चे पथक परीक्षा भवनात पोहोचले. विद्यार्थ्यांना होणाºया समस्या व सुरक्षारक्षकांची वागणूक यांची छायाचित्रे काढण्यासाठी छायाचित्रकाराने कॅमेरा काढला असता गोपनीय शाखेचे सहायक कुलसचिव मोतीराम तडस यांनी छायाचित्र काढण्यास मनाई केली. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.नीरज खटी यांचे आदेश असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच तडस यांनी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या सुरक्षारक्षकांना छायाचित्रकाराकडून कॅमेरा हिसकविण्याचे निर्देश दिले. याबाबतीत कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना कळविले असता त्यांनी डॉ.खटी यांच्याशी बोलण्यास सांगितले. अखेर डॉ.खटी यांनी जवानांना कॅमेरा परत करण्याची सूचना केली.