नागपुरात कारची काच फोडून व्यावसायिकाचे ५० हजार लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 13:13 IST2017-12-21T13:13:09+5:302017-12-21T13:13:54+5:30
शहरातील बारसमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने कारमधील ५० हजारांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.

नागपुरात कारची काच फोडून व्यावसायिकाचे ५० हजार लांबवले
आॅनलाईन लोकमत
नागपूर : शहरातील बारसमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने कारमधील ५० हजारांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.
प्रताप देवराव देवानी (वय 60, रा. बैरामजी टाऊन) यांच्या तक्र ारीनुसार त्यांनी आपली महिंद्रा कार एमएच ४९/ बी ७०११ सीताबर्डीतील व्हेरायटी चौकात असलेल्या एका बारजवळ बुधवारी उभी केली. रात्री ९ च्या सुमारास ते कारजवळ आले तेव्हा त्यांना कारची काच फुटलेली असल्याचे दिसले. त्यांनी गाडी तपासली असता कारमधील पर्स ज्यात ५० हजार रु पये, दुकानाची चावी आणि अन्य कागदपत्रे गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. देवानी यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्र ार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. या अज्ञात चोराचा तपास सुरू आहे.