नागपूर विधानभवन आता वर्षभर गजबजणार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:08 AM2021-01-04T04:08:43+5:302021-01-04T04:08:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशाच्या नकाशावर भौगोलिकदृष्ट्या नागपूरचे स्थान केंद्रस्थानी आहे. वर्षातील तीन अधिवेशनांपैकी एक अधिवेशन उपराजधानी नागपूरमध्ये ...

Nagpur Vidhan Bhavan to be bustling all year round () | नागपूर विधानभवन आता वर्षभर गजबजणार ()

नागपूर विधानभवन आता वर्षभर गजबजणार ()

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशाच्या नकाशावर भौगोलिकदृष्ट्या नागपूरचे स्थान केंद्रस्थानी आहे. वर्षातील तीन अधिवेशनांपैकी एक अधिवेशन उपराजधानी नागपूरमध्ये घेण्याची महाराष्ट्राची नागपूर करारानुसार सुरू झालेली परंपरा, संसदीय लोकशाहीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरूपी कक्ष उद्या सोमवारपासून नागपूरच्या विधानभवनात कार्यान्वित होत आहे. त्यामुळे केवळ हिवाळी अधिवेशनापुरते सुरू राहणारे नागपूरचे विधानभवन आता वर्षभर गजबजलेले राहील.

या नवीन कक्षामध्ये दोन उपसचिव, दोन अवर सचिव, दोन कक्ष अधिकारी, दोन सहायक कक्ष अधिकारी, चार लिपिक-टंकलेखक आणि चार शिपाई असा अधिकारी- कर्मचारीवर्ग असेल. यापुढील काळात विधानभवन, नागपूर येथे विधिमंडळ समित्यांच्या बैठकादेखील आयोजित केल्या जातील. त्याचप्रमाणे या विभागातील दोन्ही सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांना अधिवेशनाअगोदर प्रश्न, लक्षवेधी येथे दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सन्माननीय सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी-सदस्य, स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्थांमार्फत येणारे अभ्यासगट यांच्यासाठी विधानमंडळातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रशिक्षण उपक्रम येथे राबविले जाणार आहेत. त्यामुळे एरवी फक्त अधिवेशन काळात वर्षभरात एक महिना वर्दळ असणारी विधानभवनाची वास्तू व परिसर आता वर्षभर गजबजलेला राहील.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत दुपारी १.३० वााजता या कक्षाचे लाेकार्पण होईल.

Web Title: Nagpur Vidhan Bhavan to be bustling all year round ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.