Nagpur: व्हीआयएच्या अध्यक्षपदी विशाल अग्रवाल, सर्व पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड

By मोरेश्वर येरम | Published: June 27, 2024 08:10 PM2024-06-27T20:10:18+5:302024-06-27T20:10:42+5:30

Nagpur News: विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) अध्यक्षपदी विशाल अग्रवाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांची निवड तिसऱ्यांदा झाली आहे. तर प्रशांत मोहता यांची सचिवपदी निवड झाली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वर्ष २०२४-२५ करिता पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

Nagpur: Vishal Aggarwal as VIA President, unanimously elected by all office bearers | Nagpur: व्हीआयएच्या अध्यक्षपदी विशाल अग्रवाल, सर्व पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड

Nagpur: व्हीआयएच्या अध्यक्षपदी विशाल अग्रवाल, सर्व पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड

- मोरेश्वर मानापुरे

नागपूर -  विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) अध्यक्षपदी विशाल अग्रवाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांची निवड तिसऱ्यांदा झाली आहे. तर प्रशांत मोहता यांची सचिवपदी निवड झाली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वर्ष २०२४-२५ करिता पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. विशाल अग्रवाल यांनी उद्योगाच्या सर्वांगीण विकासावर मत व्यक्त केले. त्यांच्या समस्या नेहमीच सरकारकडे मांडण्यात येतात. यंदाही विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येणार असून त्या सोडविण्याचा प्रयत्न राहील.

सभेत कार्यकारी समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांचीही निवड करण्यात आली. उपाध्यक्ष डॉ. अनवर दाऊद, आशिष दोशी, नरेश जाखोटिया, कोषाध्यक्ष राकेश सुराणा, सहसचिव प्रतिक तापडिया, कौशल मोहता आणि शची मल्लिक आणि कार्यकारी समितीचे सदस्यांमध्ये सुरेश राठी, अतुल पांडे, रोहित बजाज, आदित्य सराफ, गौरव सारडा, सत्यनारायण नुवाल, आर बी गोयंका, डॉ सुहास बुद्धे, रोहित एम अग्रवाल, गिरीश देवधर, पंकज बक्षी, गिरधारी मंत्री, परमवीर संचेती, आशिष चंदराणा, डॉ. प्रशांत अग्रवाल, सुशील बन्सल, नितीन अग्रवाल, वरुण पारख, दिव्यम सिंघानिया, सागर अग्रवाल यांचा समावेश आहे.

Web Title: Nagpur: Vishal Aggarwal as VIA President, unanimously elected by all office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर