नागपुरात १५ नगरसेवक वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:10 AM2021-09-22T04:10:02+5:302021-09-22T04:10:02+5:30

नागपूर : नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून जाण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महापालिकेतील नगरसेवकांची संख्या या वेळी सुमारे १५ ...

Nagpur will have 15 more councilors | नागपुरात १५ नगरसेवक वाढणार

नागपुरात १५ नगरसेवक वाढणार

Next

नागपूर : नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून जाण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महापालिकेतील नगरसेवकांची संख्या या वेळी सुमारे १५ ने वाढण्याची शक्यता आहे. २०११ च्या लोकसंख्येचा आधार घेऊन वॉर्ड-प्रभाग रचना होत आहे. या वाढीव लोकसंख्येमुळे नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सद्यस्थितीत महापालिकेत १५१ नगरसेवक आहेत. ही संख्या १६६ होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार यासाठी सकारात्मक असल्याची विश्वसनीय माहिती आहे. सद्यस्थितीत असलेली चार सदस्यी प्रभाग पद्धत भाजपला फायद्याची आहे, असा निष्कर्ष काढत महापालिकेची आगामी निवडणूक एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने पूर्वीच घेतला आहे. मात्र, या निर्णयाला शिवसेना वगळता काँग्रेस व राष्ट्रवादीचा विरोध आहे. एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीत कार्यकर्त्यांना महिला व सामाजिक आरक्षणाचा फटका बसतो. मैदानात राबणाऱ्या कार्यकर्त्याला निवडणुकीपासून वंचित राहावे लागते. यामुळे एकऐवजी किमान दोन सदस्यीय प्रभाग करावा, अशी काँग्रेस- राष्ट्रवादीची भूमिका आहे. आज, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर मंथन होणार असून, अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री निवडक मंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. आश्चर्याची बाब म्हणजे या बैठकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत वाईट काहीच नाही, असेही मत काही मंत्र्यांनी व्यक्त करीत जुनीच पद्धत कायम ठेवण्याचा आग्रह धरला. त्यामुळे आता बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रत्यक्षात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशी वाढली वॉर्डाची संखया

वर्ष वॉर्डांची संखया

१९७० ४२

१९७९ ७५

१९९२ ९८

१९९७ १२९

२००२१३६

२०१२१४५

२०१७ १५१

Web Title: Nagpur will have 15 more councilors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.