नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; राहुल गांधींच्या वक्तव्याची पार्श्वभूमी भाजपाने समजून घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 02:24 PM2019-12-16T14:24:01+5:302019-12-16T14:41:43+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याची पार्श्वभूमी समजून न घेता जाणीवपूर्वक भाजप त्यावर आकांत-तांडव करत आहे. त्यांनी ती पार्श्वभूमी समजून घ्यावी, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री व आमदार अशोक चव्हाण यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याची पार्श्वभूमी समजून न घेता जाणीवपूर्वक भाजप त्यावर आकांत-तांडव करत आहे. त्यांनी ती पार्श्वभूमी समजून घ्यावी, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री व आमदार अशोक चव्हाण यांनी केले.
चव्हाण म्हणाले खासदार राहुल गांधी हे या सभागृहाचे सदस्य नाहीत. असे असतानाही त्यांच्या संदभार्तील वाद या सभागृहात उपस्थित करून भाजपा सभागृहाचा वेळ वाया घालवत आहे. प्रत्यक्षात त्यांच्या बोलण्यामागे असलेली वेगळी पार्श्वभूमी समजून घ्यावी.
16 डिसेंबर हा देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आपल्या सैन्याने पाकिस्तानवर विजय मिळविला होता.
इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात बांगलादेशाची निर्मिती झाली.
हा दिवस न पाळता भाजपने वेगळ्याच मुद्द्यांवरून गोंधळ घातला.
या विषयावर फक्त वाद घालून चालणार नाही. आम्ही सुद्धा सभागृहात या मुद्द्यावर उत्तर दिले आहे.
राऊत काय म्हणतात ते माहित नाही
आमच्या तीनही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे त्या समन्वयातूनच योग्यपणे काम सुरू आहे. तिन्ही पक्षात समन्वय असल्याने कुठेही वाद नाही. संजय राऊत काय म्हणतात हे माहीत नाही,असे त्यांनी सांगितले.
राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
त्याचा अहवाल आलेला आहे. ही बाब गंभीर आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.