नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; मुंबई मेट्रोची स्थगिती उठविण्यात यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:38 PM2019-12-20T12:38:59+5:302019-12-20T12:39:29+5:30
मुंबईतील मेट्रो रेल्वेला लावलेली स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मुंबईतील मेट्रो रेल्वेला लावलेली स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली. या कामाला भाजप सरकारच्या काळात गती देण्यात आली होती. ६५ लाख नवीन प्रवासी वाहक क्षमता या माध्यमातून निर्माण होणार होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केवळ अहंकारापोटी या कामाला स्थगिती दिली. गेल्या 24 दिवसापासून काम थांबले आहे. एका दिवसाचे नुकसान हे जवळपास साडेचार कोटीच्या घरात आहे. आजपर्यंत १०० कोटींचा भुर्दंड बसला आहे. हा भुर्दंड कॉस्ट एक्सलेशनच्या नावावर मुंबईकरांच्या माथी मारल्या जाईल. एकीकडे शिवसेना आरेला जंगल घोषित करण्याची भाषा करतात. तर दुसरीकडे निवासी क्षेत्र करण्याची भाषा करतात. नेमक तिथे निवास की जंगल, हे शिवसेनेने ठरवावे. मुंबई कारशेडची जागा सरकारच्या हक्काची आहे. मात्र हा प्रकल्प तिथे न करता तो कांजूरमार्गला हलविण्याच्या हालचाली सरकारची आहे. याच्या मोबदल्यात येथील जागचा साडेतीन हजार कोटींचा मोबदला हा खाजगी व्यक्तींच्या घशात घालण्याचा घाट करीत आहे. जेव्ही मुंबईत दर वर्षाला 25 हजार झाडे तोडण्याची मंजुरी देता आणि आता कारशेडच्या जागेवर 2446 झाडेंचा पुळका दाखवून ढोंगीपणा करता असा आरोप आशीष शेलार यांनी केला. तत्पूर्वी विधानसभेच्या पायऱ्यांवर स्थगितीच्या विरोधात भाजप आमदारांनी हातात बॅनर घेऊन निदर्शने केली.