हिरवळीत नागपूर माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:49+5:302021-06-09T04:08:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराचा एके काळी हिरवळीच्या बाबतीत देशातील टॉप १० शहरात समावेश होता, परंतु मागील ...

Nagpur withdrew in the green | हिरवळीत नागपूर माघारले

हिरवळीत नागपूर माघारले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहराचा एके काळी हिरवळीच्या बाबतीत देशातील टॉप १० शहरात समावेश होता, परंतु मागील काही वर्षांत शहरातील परिस्थिती बदलली आहे. राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात नागपूर २८व्या क्रमांकावर घसरले आहे. गेल्या काही वर्षांत शहरात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे १,५०० गुणापैकी फक्त १३० गुण मिळाले आहे.

अभियानात ३९५ शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, ३०४ पंचायत समित्यांनी सहभाग घेतला. ऑक्टोबरमध्ये या अभियानाला सुरुवात झाली. ५ जूनला याचा निकाल जाहीर करण्यात आला. यात १,१२७ गुणासह ठाणे पहिल्या क्रमांकावर आहे. नवीन मुंबईला ९७६ तर ग्रेटर मुंबईला ९५० गुण मिळाले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या अभियानाची घोषणा केली होती. पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन मिळावे व उपाययोजना कराव्यात, यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. पाणीबचतीसाठी ४०० गुण, पृथ्वीसाठी ६००, हवा १००, ऊर्जा १०० तर संवर्धन यासाठी ३०० गुण गृहीत धरण्यात आले होते. वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक, रेन वॉटर हार्वेस्टिंग या घटकांचाही विचार करण्यात आला. त्यानुसार, राज्यातर्फे एकूण गुण घोषित करण्यात आले. वर्गवारीनुसार किती गुण मिळाले. याची माहिती मिळाली नाही. मनपा यात का माघारली, अशी विचारणा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असता, क्रमांकात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Nagpur withdrew in the green

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.