नागपुरात विकृत मानसिकतेच्या मुलाने घेतला पित्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 11:54 AM2020-04-27T11:54:23+5:302020-04-27T11:54:54+5:30

विकृत मानसिकतेच्या एका नराधमाने त्याच्या पित्याचे गुप्तांग आणि गळ्यावर चावे घेऊन त्यांची हत्या केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ही घटना घडली.

In Nagpur, a youth with a perverted mentality took the life of a father | नागपुरात विकृत मानसिकतेच्या मुलाने घेतला पित्याचा बळी

नागपुरात विकृत मानसिकतेच्या मुलाने घेतला पित्याचा बळी

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विकृत मानसिकतेच्या एका नराधमाने त्याच्या पित्याचे गुप्तांग आणि गळ्यावर चावे घेऊन त्यांची हत्या केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ही घटना घडली. विजय गोविंदराव पिल्लेवार (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपीचे नाव विक्रांत पिल्लेवार (वय २५) आहे.

मृत विजय पिल्लेवार प्रॉपर्टी डीलिंग करायचे. त्यांना पत्नी, मुलगी आणि आरोपी विक्रांत नामक मुलगा आहे. विक्रांत एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करतो. गेल्या अनेक वर्षापासून तो बॉडी मेन्टेन करण्यासाठी स्टेरॉईड आणि इतर सप्लीमेंटस् घेतो. शनिवारी सकाळी त्याने काय घेतले कळायला मार्ग नाही. मात्र तो विकृतासारखा वागू लागला. त्याच्या विचित्र वर्तनाची माहिती आईने त्याच्या वडिलांना दिली. त्यामुळे रात्री ९ च्या सुमारास विजय पिल्लेवार यांनी विक्रांतला काय झाले, कशाला असा वागतो, अशी विचारणा केली. त्यावरून तो वडिलांवर चवताळून गेला व त्यांना जबर मारहाण करत किचनमधून हॉलमध्ये आणि हॉलमधून बाहेर खेचत आणले. त्यांना खाली पाडून त्यांच्या गळ्ययावर आणि गुप्तांगावर चावे घेऊन त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. विकृत विक्रांत एखाद्या जनावरासारखा वडिलांना चावे घेत होता. त्याची ही विकृती बघून आई आणि बहीण आरडाओरड करत घराबाहेर पळाली. त्यांची आरडाओरड ऐकून शेजारी गोळा झाले. त्यांनी हुडकेश्वर पोलिसांना माहिती कळविली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी निपचित पडलेल्या विजय पिल्लेवार यांना मेडिकलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी त्याला अटक केल्याच्या काही वेळेनंतर काय झाले, कुठे झाले, कसे झाले, आपल्याला पोलीस ठाण्यात कशाला आणले, अशी विचारणा तो पोलिसांना करू लागला. त्याला आज दुपारी ४ वाजता पोलिसांनी न्यायालयात हजर केले. तेथेही त्याचे वर्तन तसेच होते. तुम्ही मला न्यायालयात कशाला आणले, आपण काय केले, आपला काय दोष आहे, असे प्रश्न करून त्याने पोलिसांना भंडावून सोडले होते.

त्यांचा जीव वाचला

आरोपी विक्रांत त्याच्या वडिलांना मारत असल्याचे पाहून त्याची आई बचावासाठी पुढे धावली असता तिच्यावरही तो चवताळून धावला. त्याच्या बहिणीने आईला कसेबसे बाहेर नेले आणि त्या दोघी घरातून बाहेर पडल्यामुळे त्यांचे जीव वाचले. या घटनेमुळे हुडकेश्वर परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे.

 

Web Title: In Nagpur, a youth with a perverted mentality took the life of a father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून