नागपूर जिल्हा परिषद : शिक्षकांच्या अतिरिक्त १२ जागा केल्या खुल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 08:30 PM2020-10-14T20:30:41+5:302020-10-14T20:32:31+5:30

Zillha Parishad, teacher, issue, Nagpur news शिक्षकांच्या बदली प्रकरणात जिल्हा परिषदेने अतिरिक्त १२ जागा खुल्या केल्या आहे. शिक्षक संघटनांनी सर्वच जागा खुल्या कराव्यात असा आग्रह प्रशासनाकडे केला होता. तर पदाधिकाऱ्यांनी १४० जागा खुल्या कराव्यात यासाठीही प्रयत्न केले होते. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने कुणाचेही ऐकून न घेता अतिरिक्त १२ जागा खुल्या केल्या.

Nagpur Zilla Parishad: 12 additional teacher posts open | नागपूर जिल्हा परिषद : शिक्षकांच्या अतिरिक्त १२ जागा केल्या खुल्या

नागपूर जिल्हा परिषद : शिक्षकांच्या अतिरिक्त १२ जागा केल्या खुल्या

googlenewsNext

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : शिक्षकांच्या बदली प्रकरणात जिल्हा परिषदेने अतिरिक्त १२ जागा खुल्या केल्या आहे. शिक्षक संघटनांनी सर्वच जागा खुल्या कराव्यात असा आग्रह प्रशासनाकडे केला होता. तर पदाधिकाऱ्यांनी १४० जागा खुल्या कराव्यात यासाठीही प्रयत्न केले होते. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने कुणाचेही ऐकून न घेता अतिरिक्त १२ जागा खुल्या केल्या. प्रशासनाने सुरुवातीला ९० रिक्त जागा खुल्या केल्या होत्या. आता १२ जागांची त्यात भर पडल्याने विस्थापित व रॅण्डमच्या शिक्षकांना १०२ जागांचे पर्याय उपलब्ध आहे. २०१८ च्या बदल्यातील विस्थापित व रॅण्डमच्या २४३ सहा. शिक्षकांपैकी इच्छुक शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करता येणार आहे. प्रशासन ९० रिक्त जागांवर सहा. शिक्षकांना पदस्थापना देणार आहे. यात ४४ शिक्षक आंतर जिल्हा बदलीचे आहे. तर अनुसूचित जाती सरळ सेवा भरती प्रक्रियेत निवड करण्यात आलेले ४६ शिक्षक आहे. पण बदली प्रक्रियेत प्रशासन विस्थापित आणि रॅण्डमच्या शिक्षकांना प्राधान्य देणार आहे. इच्छुक शिक्षकांनी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ पर्यंत गटशिक्षणाधिकाऱ्यांना अर्ज करायचे आहे. १६ व १७ ऑक्टोबर रोजी समुपदेशनाने बदलीची प्रक्रिया होणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्रा.) चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.

Web Title: Nagpur Zilla Parishad: 12 additional teacher posts open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.