नागपूर जिल्हा परिषद पदभरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
By गणेश हुड | Published: June 8, 2024 09:42 PM2024-06-08T21:42:38+5:302024-06-08T21:43:03+5:30
प्रवेशपत्रात नमुद केलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नागपूर : लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेली जिल्हा परिषदेतील सरळ सेवा भरती प्रक्रीया पुन्हा सुरू होणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने चार संवर्गाची परीक्षा १० ते २१ जून दरम्यान घेण्यात येणार आहे. यात आरोग्य सेवक (पुरुष )४० टक्के, आरोग्य सेवक (पुरुष )५० टक्के , आरोग्य सेवक महिला तसेच ग्रामसेवक या संवर्गाचा समावेश आहे. पदनिहाय होणाऱ्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
ज्या उमेदवारांनी संबंधित पदांसाठी अर्ज केलेले आहे. त्यांनी प्रवेशपत्र उपलब्ध करण्यासाठी www.nagpurzp.com या संकेत स्थळाला भेट द्यावी. प्रवेशपत्रात नमुद केलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नियोजित परिक्षेचे संभाव्य वेळापत्रक
आरोग्य सेवक (पुरुष )४० टक्के -१० ते १२ जून
आरोग्य सेवक (पुरुष )५० टक्के -१३ ते १५ जून
आरोग्य सेवक (महिला ) १६ जून
ग्रामसेवक १६ ते २१ जून