नागपूर जिल्हा परिषद : १० विषय समितींवर सदस्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:54 PM2020-02-17T22:54:23+5:302020-02-17T22:55:58+5:30

अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींची निवड झाल्यानंतर सोमवारी विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेत १० विषय समिती आहे. त्यावर प्रवर्गनिहाय सदस्यांची निवड झाली.

Nagpur Zilla Parishad: Selection of members on 3 subject committees | नागपूर जिल्हा परिषद : १० विषय समितींवर सदस्यांची निवड

नागपूर जिल्हा परिषद : १० विषय समितींवर सदस्यांची निवड

googlenewsNext
ठळक मुद्देसहा सदस्यांनी मागे घेतले अर्ज : स्थायी समितीत ज्येष्ठ सदस्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींची निवड झाल्यानंतर सोमवारी विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेत १० विषय समिती आहे. त्यावर प्रवर्गनिहाय सदस्यांची निवड झाली. स्थायी समितीबरोबरच कृषी, शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालकल्याण समितीसाठी अतिरिक्त अर्ज आले होते. सहा सदस्यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर समितीनिहाय सदस्यांची घोषणा करण्यात आली. जि.प.त महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समितीवर ज्येष्ठ आणि तज्ज्ञ सदस्यांची निवड करण्यात आली.
जिल्हा परिषदच्या अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेत विशेष समितीची सभा पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सभापती तापेश्वर वैद्य, उज्ज्वला बोढारे, भारती पाटील व नेमावली माटे उपस्थित होते. सभेपूर्वी युवक कल्याण मंत्री सुनील सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना गावंडे यांची जिल्हा परिषदेत बैठक झाली. तीत संख्याबळाच्या आधारवर काँग्रेससह राष्ट्रवादी व भाजपच्या सदस्यांना समितीवर सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. सभा सुरू होण्यापूर्वी सर्वच पक्षाच्या सदस्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अर्जाची छाननी झाल्यानंतर सभेला सुरुवात झाली. स्थायी समितीबरोबरच कृषी, समाजकल्याण, शिक्षण समितीवर एक अर्ज अतिरिक्त आला होता तर महिला व बालकल्याण समितीवर दोन अर्ज अतिरिक्त आले होते. अर्ज मागे घेण्यास सभागृहाने अर्धा तास दिला. त्यात सलील देशमुख, मनीषा फेंडर, दीक्षा मुलताईकर, पिंकी कौरती, वंदना बालपांडे, ज्योती शिरस्कर या सदस्यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विषय समितीवर निवड झालेल्या सदस्यांची घोषणा केली.

समितीनिहाय निवड झालेले सदस्य : स्थायी समिती

ज्योती राऊत, वंदना बालपांडे, ज्ञानेश्वर कंभाले, अवंतिका लेकुरवाळे, संजय झाडे, अनिल निधान, आतिष उमरे, दिनेश बंग

बांधकाम समिती
कैलास बरबटे, व्यंकट कारेमोरे, चंद्रशेखर कोल्हे, दुधाराम सव्वालाखे, अर्चना भोयर, माधुरी गेडाम, शालिनी देशमुख, छाया बनसिंगे

आरोग्य समिती
पुष्पा चाफले, कविता साखरवाडे, मनीषा फेंडर, सलील देशमुख, देवका बोडखे, नीलिमा उईके, अर्चना भोयर, शालिनी देशमुख

वित्त समिती
प्रमिला दंडारे, राधा अग्रवाल, सुचिता ठाकरे, राजकुमार कुसुंबे, ज्ञानेश्वर कंभाले, मुक्ता कोकर्डे, योगेश देशमुख, देवानंद कोहळे

जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती
ज्योती शिरस्कर, ममता धोपटे, प्रकाश खापरे, छाया बनसिंगे, अनिल निधान, सलील देशमुख

समाजकल्याण समिती
सुभाष गुजरकर, समीर उमप, मुक्ता कोकर्डे, राजकुमार कुसुंबे, कैलास राऊत, कैलास राऊत, शंकर डडमल, मेघा मानकर, ममता धोपटे, महेंद्र डोंगरे, शांता कुमरे, चंद्रशेखर कोल्हे

कृषी समिती
सतीश डोंगरे, भोजराज ठवकर, वृंदा नागपुरे, समीर उमप, पिंकी कौरती, मिलिंद सुटे, योगेश देशमुख, सुनिता ठाकरे, कैलास राऊत, प्रीतम कवरे

शिक्षण व क्रीडा समिती
राजेंद्र हरडे, मोहन माकडे, देवका बोडखे, दुधाराम सव्वालाखे, मिलिंद सुटे, सुनिता ठाकरे, प्रकाश खापरे, शांता कुमरे

पशुसंवर्धन समिती
पुष्पा चाफले, राजेंद्र हरडे, दीक्षा मुलताईकर, पूनम जोध, प्रीतम कवरे, मेघा मानकर, महेंद्र डोंगरे, देवानंद कोहळे

महिला व बालकल्याण समिती
अनिता वलके, अर्चना गिरी, राधा अग्रवाल, पूनम जोध, सुचिता ठाकरे, नीलिमा उईके, ज्योती राऊत, माधुरी गेडाम

समित्यांचे सदस्य ठरले, सभापती ठरेना
जिल्हा परिषदेच्या तीन सभापतींना अजूनही समिती वाटपाची प्रतीक्षा आहे. हे तीनही सभापती काँग्रेसच्या गोटातील आहेत. सोमवारी झालेल्या विशेष सभेत हा गुंता सुटेल, अशी अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी हा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांना दिल्याने पुन्हा उलटसूलट चर्चांना ऊत आला आहे.
सध्या जिल्हा परिषदेत कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण व वित्त, बांधकाम व आरोग्य या विषय समितीवर सभापतीची निवड व्हायची आहे. तशी ३० जानेवारीला सभापतींची निवड झाली. पण शिक्षण आणि कृषी समितीवर सभापती कोण? हे निश्चित झाले नाही. शिक्षण सभापतीच्या कक्षात भारती पाटील व कृषी सभापतीच्या कक्षात तापेश्वर वैद्य यांनी बसण्यास सुरूवात केली. पण ते अधिकृत नव्हते. अधिकृत निवड ही विशेष सभेत होईल, असे सांगण्यात येत होते. सोमवारी विशेष सभाही पार पडली. यात समितीवर सदस्यांची निवडही झाली. पण विषय समित्यांना सभापती कोण? हे आजही गुलदस्त्यातच ठेवले. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सभापती तापेश्वर वैद्य, भारती पाटील यांच्याकडेच ही जबाबदारी येणार आहे. हे तिघेही काँग्रेसचे सदस्य असून, निवडीला होत असलेल्या विलंबावरून काँग्रेसमधील अंतर्गत गुंता सुटताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
सोमवारी झालेल्या विशेष सभेत पहिलाच विषय सभापतीच्या निवडीचा आला. पण नाना कंभाले यांनी हा अधिकार अध्यक्षांना द्यावा, असा प्रस्ताव ठेवला. त्याचे काँग्रेसच्या काही सदस्यांनी समर्थनही केले. मात्र राष्ट्रवादीच्या चंद्रशेखर कोल्हे यांनी ही बाब नियमात बसते का, हे तपासून बघावे अशी सूचना करीत अप्रत्यक्ष विरोध दर्शविला. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमात बसत असल्याचे सांगितल्यामुळे विषयाला सभागृहात विराम मिळाला.

दोन-तीन दिवसात निश्चित होईल
सभापती ठरविण्याचे अधिकार अध्यक्षांना दिल्याने, यासंदर्भात अध्यक्ष रश्मी बर्वे यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, पक्षात अंतर्गत कुठलीही नाराजी नाही. दोन ते तीन दिवसात सभापती निश्चित होईल. पण सभापतीला विषय समितीचे वाटप का झाले नाही, यामागचे कारण त्या स्पष्ट करू शकल्या नाही.

 

Web Title: Nagpur Zilla Parishad: Selection of members on 3 subject committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.