नागपूरकरांनो, आता तक्रार करा, ‘हॅलो महापौर अॅप’ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:47 PM2020-02-11T12:47:45+5:302020-02-11T12:51:40+5:30
नागपूर शहरातील नागरिकांच्या तक्रारींचे आता हॅलो महापौर अॅपवरून निराकरण होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संपर्क साधता यावा, त्यांना समस्या, तक्रारी मांडता याव्यात, यासाठी आता कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. हॅलो महापौर अॅपवरून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण होईल. अॅपच्या माध्यमातून आता नागरिकांना मोबाईलवरूनच आपल्या सूचना, तक्रारी थेट महापौरांपर्यंत पोहचविता येणार आहेत. तसेच शहरातील स्वच्छतागृहांची माहिती उपलब्ध होणार आहे. या अॅपचे महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी लोकार्पण केले. यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर आदी उपस्थित होते.
महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नागरिकांशी थेट संपर्क साधण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. यात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारीसाठी नागरिकांना कुठे जाण्याची गरज भासू नये, यासाठी अॅप बनविण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांच्या परिश्रमानंतर तो तयार करण्यात आला. गरज भासल्यास यात पुन्हा सुधारणा केल्या जातील, अशी माहिती संदीप जोशी यांनी यावेळी पत्रकारांना दिली.
सध्या प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया व स्मार्ट फोनचा वापर करतात. त्यांनी मोबाईलमध्ये अॅप डाऊ न लोड केल्यास तक्रार करता येईल. तसेच तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली, याची माहिती तक्रारकर्त्यांना दिली जाईल. झोनस्तरावर जनता दरबार घेतले जात आहेत. यात प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा केला जात आहे. मंगळवारी झोनमधील एक तक्रार मागील अनेक महिन्यापासून आहे. यासंदर्भात झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊ त यांना कारणे द्या नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हॅलो महापौर अॅपच्या माध्यमातून थेट महापौरांच्या व्हॉट्सअॅपशी संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे नागरिकांची तक्रार स्वत: महापौर पाहून त्यावर प्रशासनाला निर्देशित करतील. महापौरांकडे आपल्या तक्रारी मांडल्यानंतर आपल्या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीची माहितीही आॅनलाईन घरबसल्या पाहता येणार आहे. या अॅपसाठी मनपा मुख्यालयात विशेष यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
अशी नोंदवा तक्रार
गुगल प्ले-स्टोअरवरून हॅलो महापौर हे अॅप डाऊनलोड करा.
तक्रार नोंदवा या आयकॉनवर क्लिक करा.
आपले झोन, तक्रारीचे स्वरूप, पूर्ण नाव, संपर्क क्रमांक यासह संपूर्ण तक्रार नोंदवून संपादन यावर क्लिक करा.
अॅपची वैशिष्ट्ये
अॅपवरून थेट महापौरांच्या व्हॉट्सअॅपशी कनेक्ट होता येईल.
मनपाच्या विविध योजनांची माहिती मिळविता येईल.४मनपाच्या दैनंदिन बातम्या पाहता येतील. ४झोननिहाय तक्रार नोंदविता येईल.४स्वच्छ नागपूर आयकॉनवरून कचरा संकलन करणाºया एजन्सीशी संपर्क साधता येईल. ४गुगल मॅपवरून आपल्याला जवळील स्वच्छतागृह शोधता येतील.४मनपातर्फे यशस्वीरीत्या राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची यशोगाथा अॅपद्वारे जाणता येईल.