तुकाराम मुंढे यांच्या भेटीसाठी चाहत्यांची लागली रांग; शुक्रवारी नागपूर सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 05:41 PM2020-09-10T17:41:14+5:302020-09-10T17:42:45+5:30

नागपुरातील लॉ कॉलेज चौकात असलेल्या वसतीगृहासमोरच्या त्यांच्या निवासस्थानी दिवसभर त्यांच्या चाहत्यांनी रांगा लावून त्यांची भेट घेतली.

Nagpurians meets Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांच्या भेटीसाठी चाहत्यांची लागली रांग; शुक्रवारी नागपूर सोडणार

तुकाराम मुंढे यांच्या भेटीसाठी चाहत्यांची लागली रांग; शुक्रवारी नागपूर सोडणार

googlenewsNext
ठळक मुद्दे नागपूरकर भगिनीने बांधली राखी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: अवघ्या सहा-सात महिन्यात बेशिस्त कर्मचारी, अधिकारी व नागरिकांवर आपल्या शिस्तीची जरब बसवणारे व अल्पावधीत लोकप्रिय झालेले नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना गुरुवारी नागपूरकरांनी भेट देऊन आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. मुंढे शुक्रवारी सकाळी मुंबईकडे रवाना होत आहेत.
नागपुरातील लॉ कॉलेज चौकात असलेल्या वसतीगृहासमोरच्या त्यांच्या निवासस्थानी दिवसभर त्यांच्या चाहत्यांनी रांगा लावून त्यांची भेट घेतली.
मुंढे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचे निदान झाले होते. त्यांच्या प्रकृती रक्षणासाठी एका नागपूरकर भगिनीने नवस केला होता. ते कोरोनामुक्त झाल्याचे कळताच तिने मुंढे यांना राखी बांधून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
गुरुवारी दुपारपासूनच मुंंढे यांच्या निवासस्थानासमोर गर्दी जमू लागली होती. नागरिक आपले मनोगत व्यक्त करायला व एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या रुपात असलेल्या त्यांच्या मनातील नेत्याला भेटण्यासाठी आले होते.

नागपूरकरानी अशा शब्दात व्यक्त केल्या भावना...

आपण पुन्हा नागपूरला आलात तर आम्हाला आनंद होईल..
सामान्य नागरिकांना आयुक्त कसे असतात ते तुमच्यामुळे माहित झाले..
आपण आलात आणि दुसऱ्या दिवसापासून कामाचा धडाका लावलात..
आपल्या कामाची नेहमीच आठवण राहील..
कोविड १९ च्या काळात नागपूरला तुमची गरज होती...
प्रत्येक मातेला तिचा पुत्र हा तुमच्यासारखा व्हावा असंच वाटेल..
सर, तुम्ही स्वतंत्र पक्ष काढा.. आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ.. तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी हवे आहात..

Web Title: Nagpurians meets Tukaram Mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.