समृद्धीच्या डिसेंबरच्या मुहूर्ताचा नागपूरकरांना ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:11 AM2021-08-22T04:11:04+5:302021-08-22T04:11:04+5:30

समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनींच्या मोबदल्याबद्दल शेतकरी समाधानी आहेत. अनेकांना शासकीय दराच्या पाचपट मोबदला मिळाला. गुमगाव येथील उमेश झाडे ...

Nagpurkars of the moment of prosperity in December ... | समृद्धीच्या डिसेंबरच्या मुहूर्ताचा नागपूरकरांना ...

समृद्धीच्या डिसेंबरच्या मुहूर्ताचा नागपूरकरांना ...

Next

समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनींच्या मोबदल्याबद्दल शेतकरी समाधानी आहेत. अनेकांना शासकीय दराच्या पाचपट मोबदला मिळाला. गुमगाव येथील उमेश झाडे यांचे समृद्धी महामार्गाला लागूनच हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांची वडिलोपार्जित पावणेतीन एकर जमीन समृद्धी महामार्गात गेली. पाचपट मोबदला मिळाल्याचे त्यांनी मान्य करीत सर्वच शेतकरी मोबदल्याबाबत समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.

----------

कोविडमुळे झाला उशीर

कोरोना संकटामुळे नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या रस्त्याचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण होऊ शकले नाही, असा मंत्र्यांपासून ते एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे. अधिकारी म्हणतात, की बाधितांसाठी शिबिराची व्यवस्था केल्यामुळे कोरोना संकटातही मजूर उपलब्ध होते; परंतु ऑक्सिजनअभावी फेब्रिकेशनचे काम राहिले. त्यामुळे कामाला उशीर झाला.

---------------

अशी आहे प्रगती

स्ट्रक्चरचा प्रकार एकूण संख्या पूर्ण झाले प्रगतिपथावर असलेले

उड्डाणपूल ६९ - १९ - ४६

मोठे पूल ३१ - १३ - १६

रेल्वे ओव्हरब्रीज ८ - २ - ५

छोटे पूल ३०२ - २१० - ६०

भुयारी मार्ग २११ - १६८ - २७

हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग - ११०-९७-०५

वन्यजीवांसाठी १४-११-३

कॅनॉल पूल २०-१९-१

इंटरचेंजेस २४-२-१७

बोगदा ६-०-६

---------------

Web Title: Nagpurkars of the moment of prosperity in December ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.