नागपुरातील  आयुर्वेदच्या पीजीच्या जागा धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:40 PM2019-06-24T22:40:52+5:302019-06-24T22:42:52+5:30

राज्यातील खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागा १० टक्क्याने वाढल्या असताना, नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा मात्र रिक्त पदांमुळे धोक्यात आल्या आहेत. गेल्या १२ वर्षांपासून पदभरतीच झाली नाही. ‘सीसीआयएम’ने नुकत्याच केलेल्या महाविद्यालयाच्या पाहणीत रिक्त पदाच्या त्रुटीवर बोट ठेवले आहे तर, शासनाने ‘सीसीआयएम’ला तीन महिन्यात त्रुटी दूर करू, असे आश्वासन देऊन वेळ मारून नेली आहे.

Nagpur's Ayurvedic PG seats are in danger! | नागपुरातील  आयुर्वेदच्या पीजीच्या जागा धोक्यात!

नागपुरातील  आयुर्वेदच्या पीजीच्या जागा धोक्यात!

Next
ठळक मुद्देरिक्त पदांचे संकट : कशी होणार त्रुटींची पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागा १० टक्क्याने वाढल्या असताना, नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा मात्र रिक्त पदांमुळे धोक्यात आल्या आहेत. गेल्या १२ वर्षांपासून पदभरतीच झाली नाही. ‘सीसीआयएम’ने नुकत्याच केलेल्या महाविद्यालयाच्या पाहणीत रिक्त पदाच्या त्रुटीवर बोट ठेवले आहे तर, शासनाने ‘सीसीआयएम’ला तीन महिन्यात त्रुटी दूर करू, असे आश्वासन देऊन वेळ मारून नेली आहे.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात सध्या १०० जागांवर पदवी (यूजी) व ६० जागांवर पदव्युत्तर(पीजी)साठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या कॉलेजमध्ये एकूण ६४ अध्यापकांचा जागा मंजूर आहेत, परंतु त्यापैकी ११ जागा रिक्त आहेत. यातच ऑगस्ट २०१९ मध्ये तीन अध्यापक निवृत्त होणार असल्याने महाविद्यालय आणखी अडचणीत येणार आहे. सूत्रानुसार, तीन महिन्यांपूर्वी ‘सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन’ (सीसीआयएम) दिल्लीच्या चमूने महाविद्यालयाचे निरीक्षण केले. यात अध्यापकांची कमतरता, पायाभूत सोयींचा अभाव, पुस्तकांची कमतरता, जागांचा अभाव आदी त्रुटी काढल्या. तीन महिन्यांमध्ये त्रुटींची पूर्तता करू, असे आश्वासन महाविद्यालय प्रशासनाच्यावतीने राज्य शासनाने २० मे २०१९ रोजी ‘सीसीआयएम’ला दिले. या आश्वासनावर तूर्तास ६० जागांवर प्रवेश देण्याची परवानगी मिळाली. परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे पीजीच्या जागा संकटात आल्याचे वास्तव आहे.
पीजीच्या ८४ जागांसाठी ७५ अध्यापकाची गरज
शासकीय आयुर्वेद रुग्णालय ‘पीजी’च्या ६० वरून ८४ जागांवर प्रवेश देण्याच्या प्रयत्नात आहे. या जागांसाठी ७५ अध्यापकांची गरज आहे. मात्र, जी रिक्त आहेत तीच पदे २००७ पासून भरण्यात आली नाहीत. यामुळे भविष्यात ‘पीजी’च्या जागा वाढण्याऐवजी त्यावर संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न
‘पीजी’च्या जागेला घेऊन ‘सीसीआयएम’ने काढलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य शासनानेही यासंदर्भात आश्वासन दिले आहे. यामुळे ‘पीजी’च्या जागा संकटात येणार नाही, याची खात्री आहे.
डॉ. गणेश मुक्कावार
अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद रुग्णालय

Web Title: Nagpur's Ayurvedic PG seats are in danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.