श्री गजाननाच्या जयजयकाराने नागपूर दुमदुमले; प्रकटदिनोत्सवाला उत्साही सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:10 AM2018-02-07T10:10:35+5:302018-02-07T10:11:23+5:30

श्री संत गजानन महाराजांच्या १४० व्या प्रकटदिनोत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

Nagpur's humming in the praise of Shri Gajanan; An enthusiastic start of the showbiz festival | श्री गजाननाच्या जयजयकाराने नागपूर दुमदुमले; प्रकटदिनोत्सवाला उत्साही सुरुवात

श्री गजाननाच्या जयजयकाराने नागपूर दुमदुमले; प्रकटदिनोत्सवाला उत्साही सुरुवात

Next
ठळक मुद्दे कुठे पालखी यात्रा तर कुठे भजन, कीर्तनाचे सूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री संत गजानन महाराजांच्या १४० व्या प्रकटदिनोत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. शहरातील विविध मंदिरांमध्ये सामाजिक, धार्मिक संस्था, संघटनांच्यावतीने अनेक प्रकारचे धार्मिक व सांस्कृतिक आयोजन यानिमित्त करण्यात आले. मंगळवारी काही मंदिरामधून श्रींच्या पालखीसह मिरवणुकाही काढण्यात आल्या. भजन, कीर्तनाच्या रंगात रंगलेले गजानन भक्त आकर्षक पोशाखात दिंडीमध्ये सहभागी झाले होते. अनेक संस्थांच्यावतीने आठवडापूर्वीपासून उत्सवाला सुरुवात झाली असून पुढच्या आठवडाभर हे उत्सवाचे वातावरण राहणार आहे.

पालखी यात्रेने भारवला न्यू सुभेदार लेआऊटचा परिसर
न्यू सुभेदार ले-आऊट स्थित गजानन प्रसाद येथे संत गजानन महाराजांच्या १४० वा प्रगटदिनोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मंगळवारी यानिमित्त श्रींची भव्य पालखी काढण्यात आली. समोर पालखी व मागे श्रींची प्रतिमा असलेल्या सजलेल्या रथासह ही मिरवणूक निघाली. घोडे तसेच शिवाजी महाराज, झाशीची राणी व महापुरुषांच्या वेशभूषेत नटलेली मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पालखी यात्रेतील महावीर हनुमानाची वेशभूषा केलेले कलावंत सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या मुलींचे लेझिम पथक व भजन मंडळ व वारकरी भक्तांच्या टाळ मृदंगाच्या स्वरातील भजनांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. संपूर्ण परिसरात पालखीचे भ्रमण करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक व भक्तगण आकर्षक पोषाख परिधान करून पालखी यात्रेत सहभागी झाले होते. श्रींच्या पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसरातील रस्ते रांगोळीने सजविण्यात आले होते. ठिकठिकाणी महिलांसह कुटुंबातील सदस्य पालखीतील श्रींचे पूजन करीत होते. गेल्या ३० वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. यावेळी न्यू सुभेदार परिसरातील चौकोनी मैदानात झालेला रिंगण सोहळा डोळ्यात भरणारा ठरला.

Web Title: Nagpur's humming in the praise of Shri Gajanan; An enthusiastic start of the showbiz festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.