नागपुरात महावितरण झुकले ‘आम आदमी’ पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:17 PM2018-02-03T23:17:15+5:302018-02-03T23:18:34+5:30

उद्योगांवर कोट्यवधी रुपयांचे वीज बिल थकीत असतानाही सरकारकडून त्यांना सवलत दिली जाते. दुसरीकडे सामान्य माणसाची वीज बिल भरल्याची पावती महावितरणच्या अधिकाऱ्यांना उपलब्ध करून न दिल्याने वीज कापली जाते. याच कारणावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एका वृद्धाच्या घरची वीज कापली. परंतु त्या वृद्धाने महावितरणच्या अधिकाऱ्याला असा धडा शिकविला की अधिकारी त्यांच्यापुढे नतमस्तक झाले आणि वृद्धाच्या घरचे कनेक्शन पूर्ववत करण्यात आले.

Nagpur's Mahavitaran bend before the 'Aam Aadmi' | नागपुरात महावितरण झुकले ‘आम आदमी’ पुढे

नागपुरात महावितरण झुकले ‘आम आदमी’ पुढे

googlenewsNext
ठळक मुद्देबिल भरल्यानंतरही कापली वीज : वृद्धाचा तर्क नडला अधिकाऱ्याला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उद्योगांवर कोट्यवधी रुपयांचे वीज बिल थकीत असतानाही सरकारकडून त्यांना सवलत दिली जाते. दुसरीकडे सामान्य माणसाची वीज बिल भरल्याची पावती महावितरणच्या अधिकाऱ्यांना उपलब्ध करून न दिल्याने वीज कापली जाते. याच कारणावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एका वृद्धाच्या घरची वीज कापली. परंतु त्या वृद्धाने महावितरणच्या अधिकाऱ्याला असा धडा शिकविला की अधिकारी त्यांच्यापुढे नतमस्तक झाले आणि वृद्धाच्या घरचे कनेक्शन पूर्ववत करण्यात आले.
बजाजनगर येथे राहणाऱ्या एका वृद्धाच्या घरी काही दिवसापूर्वी महावितरणचे दोन कर्मचारी पोहचले. या कर्मचाऱ्यांनी त्यांना कळविले की, तुमचे वीज बिल थकीत आहे. त्यामुळे तुमचे कनेक्शन कापायचे आहे. वृद्धाने त्यांना सांगितले की माझ्या वीज बिलाची अंतिम तिथी २० होती. परंतु मुलाने २४ तारखेलाच वीज बिल भरले आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बिल भरल्याची पावती मागितली. घरात शोधाशोध केल्यानंतरही त्यांना पावती मिळाली नाही. त्यामुळे वृद्धाने कर्मचाऱ्यांना विनंती केली की, उद्या या, तुम्हाला पावती दाखवितो. विनंतीला मान देऊन महावितरणचे कर्मचारीही परतले.
परंतु दुसऱ्याच दिवशी कर्मचारी परत घरी पोहचले. परंतु ते आपल्या मुलाकडून पावती घेणे विसरले होते आणि मुलगा कार्यालयात गेला होता. त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुलाच्या मोबाईलवर संपर्क करण्यास सांगितले. मुलाशी संपर्क होऊ न शकल्याने, कर्मचारी वीज कापण्यास अडून बसले. वृद्धानी त्यांना काही वेळानंतर या, अशी विनंती केली, परंतु कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विनंतीला दुजोरा दिला नाही. १२८० रुपयांचे वीज बिल भरल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी वृद्धाचे काहीच न ऐकता कनेक्शन कापून घेतले.
रात्री मुलगा आल्यानंतर त्यांनी मुलाकडून बिल भरल्याची पावती घेतली. रात्र कशीबशी अंधारात घालवल्यानंतर, दुसऱ्या दिवशी ती वृद्ध व्यक्ती आपल्या परिचितासोबत महावितरणच्या कार्यालयात पोहचली. क नेक्शन कापलेले कर्मचारी त्यांना दिसले. त्यांनी पावती दाखवून वीज पुरवठा पूर्ववत करण्याची विनंती केली. परंतु कर्मचाऱ्यांनी सांगितले की, निर्धारित शुल्क भरल्याशिवाय कनेक्शन पूर्ववत करता येत नाही. निर्धारित शुल्क भरणार नसल्याने ती वृद्ध व्यक्ती अडून बसली. बिल भरले असल्यामुळे महावितरणने आपल्या रेकॉर्डमधून त्याची माहिती करून घेणे गरजेचे होते. परंतु कर्मचाऱ्यांनी तसे न करता वीज कापली.

Web Title: Nagpur's Mahavitaran bend before the 'Aam Aadmi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.