नागपूरचा पारा १.४ अंशाने खालावला; आठवडाभर थंडी कायम राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 07:46 PM2021-11-08T19:46:10+5:302021-11-08T19:46:35+5:30
Nagpur News मागील २४ तासात शहरातील तापमानाचा पारा १.४ अंश सेल्सिअसने खालावला आहे. शहरातील तापमानात घट झाली असून किमान तापमानाची नोंद १४.१ अंश सेल्सिअस करण्यात आली आहे.
नागपूर : मागील २४ तासात शहरातील तापमानाचा पारा १.४ अंश सेल्सिअसने खालावला आहे. शहरातील तापमानात घट झाली असून किमान तापमानाची नोंद १४.१ अंश सेल्सिअस करण्यात आली आहे.
दिवाळीनंतर पुन्हा विदर्भातील तापमानात घट जाणवायला लागली असून थंडीही वाढत असताना दिसत आहे. विदर्भातील शहरांमधून नागपूर शहरात मागील २४ तासात सर्वाधिक थंडीची नोंद घेण्यात आली. सकाळपासूनच थंडी जाणवत होती. सकाळी आर्द्रता ५५ टक्के होती, सायंकाळी पुन्हा त्यात घट होऊन ४९ टक्के नोंदविण्यात आली.
नागपूरच्या खालोखाल विदर्भात वर्धा येथे १४.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. त्यापाठोपाठ गोंदीया १५, यवतमाळ आणि बुलडाणा १५.४, अमरावती १५.७, गडचिरोली १५.८, चंद्रपूर १६, अकोला १६.२ आणि वशिम येथे २० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.
आठवडाभर थंडी कायम
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात अशीच थंडी कायम राहणार असल्याची शक्यता आहे. हवामानात कोरडेपणा जाणवण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
...