नागपुरात नवी सार्वजनिक शौचालये बनली दारुड्यांचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:18 PM2019-03-25T12:18:28+5:302019-03-25T12:20:18+5:30

नागपूर महापालिकेने आधुनिक पद्धतीच्या सार्वजनिक शौचालयाची निर्मिती केली. पण गेल्या वर्ष दीड वर्षापासून या शौचालयाला महापालिके ने लॉक करून ठेवले आहे. त्यामुळे रात्रीला हे शौचालय दारुड्यांचे अड्डे बनले आहे. आता शौचालयाची नासधूस व्हायला लागली आहे.

Nagpur's new public toilets became drunkers spots | नागपुरात नवी सार्वजनिक शौचालये बनली दारुड्यांचे अड्डे

नागपुरात नवी सार्वजनिक शौचालये बनली दारुड्यांचे अड्डे

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाने केले लॉकलाखोंचा खर्च कशासाठी नागपूरकरांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महापालिकेने आधुनिक पद्धतीच्या सार्वजनिक शौचालयाची निर्मिती केली. पण गेल्या वर्ष दीड वर्षापासून या शौचालयाला महापालिके ने लॉक करून ठेवले आहे. त्यामुळे रात्रीला हे शौचालय दारुड्यांचे अड्डे बनले आहे. आता शौचालयाची नासधूस व्हायला लागली आहे.
मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगपासून काही अंतरावर मनपाने गेल्या दोन वर्षापूर्वी शौचालय उभारले. पण हे शौचालय सुरूच होत नसल्याने परिसरातील लोकांनी स्वत: शौचालय सुरू करून वापर करणे सुरू केले. पण एक दिवस मनपाच्या कर्मचाऱ्यांनी शौचालयाला कुलूप लावले. या शौचालयात पाण्याचे विजेचे कनेक्शनसुद्धा लावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनपाने उभारलेल्या या शौचालयाच्या मेन्टेनन्सची जबाबदारी रोटरी क्लबला दिली होती.
रोटरी क्लबच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार होती. पण असे काहीच झाले नाही. मनीषनगरातीलच नाही तर जयताळा, पंचशील चौक, छत्रपती चौकातील शौचालय सुद्धा बंद आहे. कदाचित रोटरी क्लबने जबाबदारी स्वीकारलीच नाही. ही बंद असलेली शौचालये दारुड्यांचे अड्डे बनले आहे. शौचालयाच्या आजूबाजूला दारुच्या बॉटल पडलेल्या दिसून येतात. मनीषनगरातील शौचालयाला जोडलेल्या गटार लाईनचे कनेक्शन तोडले आहे. नळाची पाईप तोडण्यात आले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले हे सार्वजनिक शौचालय कधी सुरू होणार अशा सवाल परिसरातील नागरिकांचा आहे.

मनीषनगरातील शौचालय परिसरातील नागरिकांनी सुरू केले होते. त्याचा वापरही करण्यात येत होता. परिसरातील मंदिर कमिटीच्या माध्यमातून त्याचे मेन्टेनन्स करण्यात येत होते. पण एक दिवस मनपाच्या कर्मचाऱ्यांनी शौचालयाला लॉक लावले. आम्ही मनपाच्या झोनकडे, मेन्टेनन्सची जबाबदारी घेतलेल्या रोटरी क्लबकडेसुद्धा विचारणा केली. पण कुणीच त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही.
- प्रवीण शर्मा,
सामाजिक कार्यकर्ता

Web Title: Nagpur's new public toilets became drunkers spots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.