‘एमएचटी-सीईटी’मध्ये नागपूरचा राहुल पाठक ‘टॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:01 AM2019-06-05T00:01:48+5:302019-06-05T00:02:41+5:30

औषधविज्ञानशास्त्र, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. महाविद्यालये व विविध कोचिंग क्लासेसकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार यशोदा ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी राहुल पाठक याने ९९.९५ पर्सेंटाईलसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

Nagpur's Rahul Pathak tops in 'MHT-CET' | ‘एमएचटी-सीईटी’मध्ये नागपूरचा राहुल पाठक ‘टॉप’

‘एमएचटी-सीईटी’मध्ये नागपूरचा राहुल पाठक ‘टॉप’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : औषधविज्ञानशास्त्र, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. महाविद्यालये व विविध कोचिंग क्लासेसकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार यशोदा ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी राहुल पाठक याने ९९.९५ पर्सेंटाईलसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
राज्यभरातील वैद्यकीय, अभियांत्रिकी व औषधविज्ञानशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी राज्य सामायिक परीक्षा विभागातर्फे २ मे ते १३ मे या कालावधीदरम्यान घेण्यात आली होती. नागपूर जिल्ह्यातून २५ हजारांहून अधिक परीक्षार्थी बसले होते. नागपुरातूनव डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी गौरव वासनिक यांनी ९९.९४९ पर्सेंटाईलसह द्वितीय तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी सलोनी सिंह हिने ९९.९४२ पर्सेंटाईलसह तृतीय स्थान पटकाविले.
याशिवाय सेंट पॉल ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी शुभम कलंत्री याला ९९.९१ पर्सेंटाईल मिळाले, तर वेदांश सांघी याला ‘पीसीबी’ गटातून ९९.८९ पर्सेंटाईल प्राप्त झाले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी मुस्कान त्रिवेदी हिला ९९.८८ पर्सेंटाईल मिळाले. याशिवाय अनंत सोहळे (९९.८८), अथर्व कठाळे (९९.८३), कल्याणी सैनिस (९९.८५) यांनीदेखील यश संपादित केले.
‘सर्व्हर डाऊन’चा फटका
मंगळवारी दुपारी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, ‘सर्व्हर डाऊन’ असल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहताना अडचणींचा सामना करावा लागला. कित्येक विद्यार्थ्यांना सायंकाळी ७ वाजेपर्यंतच आपला निकालच पाहता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी शिक्षण विभागाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
९९ हून अधिक ‘पर्सेंटाईल’ मिळालेले विद्यार्थी
राहुल पाठक ९९.९५
गौरव वासनिक ९९.९४९
सलोनी सिंह ९९.९४२
शुभम कलंत्री ९९.९१
साहिल गिºहेपुंजे ९९.९०
वेदांश सांघी ९९.८९
मुस्कान त्रिवेदी ९९.८८
अनंत सोहळे ९९.८८
सुभाष चांडक ९९.८६
अथर्व कठाळे ९९.८३
कल्याणी सैनिस ९९.८५
ईशान प्रयागी ९९.८१
शुभम काळे ९९.८०
प्रथमेश गणोरकर ९९.७३
कैवल्य पितळे ९९.७०
चिराग कसाट ९९.७०
अभिषेक सिंह ९९.७०
हरीश बडवाईक ९९.६९
पीयूष पिसे ९९.६३
अश्विन बापट ९९.६३
आदित्य तिडके ९९.६२
नीलेश पलांदुरकर ९९.५३
प्रथमेश मेहरे ९९.२०
मिहीर चौधरी ९९.२०

Web Title: Nagpur's Rahul Pathak tops in 'MHT-CET'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.