राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नागपूरच्या सोनाली पाटमासेची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:12 AM2019-12-29T00:12:31+5:302019-12-29T00:13:21+5:30
मालवण येथील चिवला ब्रिजवर झालेल्या दहाव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नागपूरची कन्या सोनाली मनोहर पाटमासे हिने बाजी मारून सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मालवण येथील चिवला ब्रिजवर झालेल्या दहाव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नागपूरची कन्या सोनाली मनोहर पाटमासे हिने बाजी मारून सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकावला आहे. सोनाली पाटमासे हिने अंबाझरी तलाव येथे भोजराज मिश्रा आणि कामगार कल्याण केंद्र येथे अमित यादव यांच्या देखरेखीत सराव करून हा विजय मिळविला आहे. सागरी किनारा नसलेल्या नागपूरच्या सोनालीने कोकणातील अरबी समुद्राला आव्हान देत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा जोशी जलतरण संघटनेच्यावतीने मालवणच्या चिवला बीचवर १५ डिसेंबरला राष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत २५ ते ३५ वयोगटात सोनालीने तीन किलोमिटर अंतर पोहून तिसरे स्थान पटकावून कांस्यपदक मिळविले. स्पर्धेत नागपूरच्या जलतरणपटूंचाही समावेश होता. त्यांनी सुद्धा उत्कृष्ट कामगिरी बजावली. खाºया पाण्याची तमा न बाळगता खवळलेल्या समुद्रातून तीन किलोमीटर अंतर अवघ्या ४९ मिनिटे १५ सेकंदात पार करीत तिने किनारा गाठला. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पुरस्कार, पदक, बॅग, टॉवेल, जर्सी आणि भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले. विजेत्या स्पर्धकांचे गणेश ढोले, निलेश गुजर, प्रभाकर साठे, कृष्णा बेसले, आशिष सूर्यवंशी यांनी कौतुक केले आहे. नागपूरला प्रियदर्शिनी येथे अॅक्वाथ्लॉन चौथ्या जलतरण स्पर्धेत स्विमींग प्लस रनिंगमध्ये दुसरा क्रमांक घेऊन तिने सिल्व्हर मेडल मिळविले.