नागपूरचे तंत्रज्ञान जाणार युरोपमध्ये; निर्मिती रोबोटिक्सशी शुकोचा करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:25 PM2018-03-19T12:25:25+5:302018-03-19T12:25:33+5:30

आजवर आपण विदेशी कंपन्यांशी करार करत होतो ते तंत्रज्ञान आयात करण्यासाठी. पण आता चक्क शुको नावाच्या जर्मन उद्योगाने नागपूरच्या निर्मिती रोबोटिक्सशी करार केला असून, आता नागपूरचे तंत्रज्ञान युरोपमध्ये वापरले जाणार आहे.

Nagpur's technology will be in Europe; Creation agreement with Robotics | नागपूरचे तंत्रज्ञान जाणार युरोपमध्ये; निर्मिती रोबोटिक्सशी शुकोचा करार

नागपूरचे तंत्रज्ञान जाणार युरोपमध्ये; निर्मिती रोबोटिक्सशी शुकोचा करार

Next
ठळक मुद्देव्हीआयएचे सहकार्य

सोपान पांढरीपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजवर आपण विदेशी कंपन्यांशी करार करत होतो ते तंत्रज्ञान आयात करण्यासाठी. पण आता चक्क शुको नावाच्या जर्मन उद्योगाने नागपूरच्या निर्मिती रोबोटिक्सशी करार केला असून, आता नागपूरचे तंत्रज्ञान युरोपमध्ये वापरले जाणार आहे. विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशन (व्हीआयए)च्या सहकार्याने हा करार झाला हाहे.निर्मिती रोबोटिक्सची स्थापना २०१६ मध्ये झाली असून, विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन अल्पावधीत लोकप्रिय करणारे यशस्वी उद्योजक बंधू कार्तिक/सुदर्शन व मनीष शेंडे यांच्या कल्पनेतून ही कंपनी साकार झाली आहे. या तंत्रज्ञानाचे जनक जय मोटघरे, राजेश आदमने, कार्तिक शेंडे हे संचालक तर सुदर्शन शेंडे हे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
निर्मिती रोबोटिक्सजवळ ओझोन स्टरलायझेशन हे पेटंट केलेले तंत्रज्ञान असून, त्याचा उपयोग इमारतीमधील एअर कंडिशनिंग डक्ट आतून नुसते स्वच्छ करण्यासाठी नव्हे तर निर्जंतूक करण्यासाठी केला जातो. जगातले डक्ट निर्जंतूक करणारे हे एकमेव तंत्रज्ञान आहे, अशी माहिती सुदर्शन शेंडे व जय मोटघरे यांनी दिली.एअरकंडिशनिंग डक्ट सहसा स्वच्छ केले जात नाहीत. त्यामुळे आतमध्ये नुसती धूळच नव्हे तर मानवी आरोग्याला अपायकारक विषारी जीवाणूही तयार होतात. ओझोन स्टरलायझेशनमध्ये डक्टमधील रोबोटच्याद्वारे केवळ बाहेर काढली जात नाही तर डक्ट आतून निर्जंतूक केले जाते, असे जय मोटघरेंनी सांगितले.निर्मिती रोबोटिक्सने या तंत्रज्ञानाचा उपयोग महानिर्मितीची ऊर्जा केंद्रे, भारतीय रेल्वेचे मुंबईमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, सेंट्रल रेल्वेचे डेटा सेंटर व मुख्य रिझर्व्हेशन हॉल, ट्रेन मॅनेजमेंट सिस्टिम हॉल येथे केले आहे. आम्ही केवळ रोबोट बनवत नाही तर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत आठ कर्णबधिर मुलांना आम्ही रोजगारही दिला आहे. आमची कंपनी स्टार्ट-अप पंजीबद्ध आहे व आम्ही मेक-इन इंडिया शिवाय स्वच्छ भारत अभियानातही योगदान देतो, हे सुदर्शन शेंडे यांनी अभिमानाने नमूद केले. लवकरच सुदर्शन शेंडे व जय मोटघरे हे जर्मनीला भेट देणार असून, तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करून कराराला मूर्तरूप देतील. शुको समूहाने निर्मितीच्या रोबोसह तंत्रज्ञान व सेवा असे तिन्ही प्रकार वापरण्याची तयारी दर्शविली आहे, असे मोटघरे यांंनी सांगितले.

Web Title: Nagpur's technology will be in Europe; Creation agreement with Robotics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.