जल्लोषात सहावे पर्व; नागराज खुरसने, प्राजक्ता गोडबोले ‘नागपूर महामॅरेथाॅन’चे विजेते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 12:42 PM2023-02-06T12:42:01+5:302023-02-06T12:43:45+5:30

२१ किलोमीटर खुल्या गटात मारली बाजी : आबालवृद्धांचा नादखुळा प्रतिसाद

Nagraj Khurasane, Prajakta Godbole winner of Nagpur 'Lokmat Mahamarathon' | जल्लोषात सहावे पर्व; नागराज खुरसने, प्राजक्ता गोडबोले ‘नागपूर महामॅरेथाॅन’चे विजेते

जल्लोषात सहावे पर्व; नागराज खुरसने, प्राजक्ता गोडबोले ‘नागपूर महामॅरेथाॅन’चे विजेते

Next

नागपूर : पहाटेच्या शीतल वातावरणात ढोल-ताशे, लेझीम, पोलिस बँड, झुम्बा, शाळकरी मुलींचे नृत्य, विविध रंगांची उधळण करणारी आतषबाजी, युवक-युवतींचा आत्मविश्वास अशा ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात रविवारी ऐतिहासिक कस्तूरचंद पार्कवर आर. सी. प्लास्टो टँक ॲन्ड पाइप्स प्रस्तुत पॉवर्ड बाय गॅस ॲथॉरिटी इंडिया लिमिटेड आणि निर्मय इन्फ्राटेक ‘लोकमत नागपूर महामॅरेथाॅन’ रंगली. अत्यंत जल्लोषी वातावरणात रंगलेली महामॅरेथाॅन खुल्या गटात नागराज खुरसने व प्राजक्ता गोडबोले हिने जिंकली. नागराजने पुरुष गटात २१ किलोमीटरची शर्यत १ तास पाच मिनिटे २५ सेकंदांत, तर प्राजक्ताने १ तास १९ मिनिटे आणि १२ सेकंदांत स्पर्धा पूर्ण केली. ‘नागपूरचा मान, लोकमत महामॅरेेथॉन’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया स्पर्धकांनी व्यक्त केली.

सहा वाजता २१ किलोमीटरच्या खुल्या गटातील धावपटूंना मान्यवरांनी फ्लॅगऑफ करताच स्पर्धकांचा लोंढा धावू लागला. ठरावीक वेळेनंतर एकापाठोपाठ एक गटातील स्पर्धा सोडण्यात आली. प्रत्येकवेळी स्पर्धेतील थरार व उत्साह वाढत गेला. या स्पर्धेचे नियोजन इतके जबरदस्त होते की, स्पर्धकांना निकोप स्पर्धेचा आणि जल्लोषी वातावरणाचा वेगळाच अनुभव घेता आला.

या स्पर्धेने नागपूरच्या क्रीडाविश्वात एक वेगळीच ओळख प्रस्थापित केल्याचे प्रत्यंतर यावेळी आले. स्पर्धेच्या उद्घाटनास सर्वपक्षीय नेतेमंडळींनी भल्या पहाटेसुद्धा आवर्जून उपस्थिती दर्शविली.

‘महामॅरेथॉन’मध्ये धावले सुसाट नागपूरकर; स्पर्धेला उदंड प्रतिसाद

१९ फेब्रुवारीला यायचं पुण्यात...

राज्यभरात लोकप्रियतेचे नवनवे शिखर गाठणाऱ्या महामॅरेथाॅनची पुढील स्पर्धा १९ फेब्रुवारीला पुणे येथे होणार आहे.

नृत्य, लेझीम, ढोल-झांज वादनातून धावपटूंना चीअरअप

चीअर डान्स, झांजांचा ताल, ढोलांचा नाद, पोलिस बॅन्ड, शर्यतींच्या विविध मार्गात सखी मंचच्या महिला सदस्यांनी सादर केलेली लयबद्ध नृत्ये... अशा अभूतपूर्व जल्लोषात धावपटूंना चीअरअप केले.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; नेटके वाहतूक नियोजन

नागपूर पोलिसांनी मॅरेथॉन मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक व पार्किंगचे नेटके नियोजन केल्याने स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यास मदत झाली. कस्तूरचंद पार्क, मॉरिस कॉलेज परिसर, मनपा कार्यालय परिसर आदी ठिकाणी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. वाहतूक शाखेच्या उपायुक्त चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक डोळस आणि अन्नछत्रे यांनी वाहतुकीचे नियोजन सांभाळले.

तोच जोश.. तोच जल्लोष! लोकमत महामॅरेथॉनमध्ये दिसले फिटनेसचे रंग; धावपटूंचे जागोजागी स्वागत

पोलिस, जवानांचा उत्साही सहभाग

संरक्षण दलातील स्पर्धकांसाठी स्वतंत्र बक्षिसे होती. पोलिसांसह सैन्यदलातील जवान, भारत राखीव बटालियनचे जवान, होमगार्ड व सेवानिवृत्त पोलिसांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

मान्यवरांची उपस्थिती

महामॅरेथॉनच्या विविध शर्यतींना झेंडा दाखविण्यासाठी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास ठाकरे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्ण बी., लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा, महामॅरेथॉनच्या संचालिका रुचिरा दर्डा, वैभव प्लास्टो प्रिंटिंग अँड पॅकेजिंग प्रा. लिमिटेड डायरेक्टर वैभव अग्रवाल, मॉयलच्या संचालिका (मनुष्यबळ) उषा सिंग, गॅस ॲथॉरिटी (इंडिया) लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक (प्रोजेक्ट) के. के. सचदेवा, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे प्राध्यापक राहुल माकडे, नेल्सन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सेंटर हेड डॉ. सोनलकुमार भगत, सीए प्रशांत खारोडे (डायरेक्टर फायनान्स), निर्मय इन्फ्राटेकचे संचालक नयन घाटे, श्रीमती नेहा घाटे, ट्रीट आइस्क्रीमचे सीईओ अमोल चकलनवार, गॅस ॲथॉरिटी इंडिया लिमिटेडचे महाव्यवस्थापक (कन्स्ट्रक्शन) फनिंद्र महाजन, विवेक वाठोडकर (सीजीएम ओ अँड एम), निर्मिक बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या संचालिका जया अंभोरे आणि सतीश अंभोरे, फिटजी नागपूर केंद्राचे व्यवस्थापक पार्टनर प्रणय शर्मा, अश्विनी पाटील सक्षम अधिकारी गॅस ॲथॉरिटी इंडिया लिमिटेड मुंबई, लोकमतचे संचालक परिचालन अशोक जैन, रेस डायरेक्टर संजय पाटील यांची उपस्थिती होती. 

- पुरस्कार वितरण समारंभाला आमदार मोहन मते, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार अभिजित वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुणेश्वर पेठे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव अतुल कोटेचा, डॉ. जी. व्ही. बसवराजा (आयएपी, राष्ट्रीय अध्यक्ष), बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा, महामॅरेथॉनच्या संचालिका रुचिरा दर्डा, प्लास्टोचे संचालक वैभव अग्रवाल, नागपूर परिवहन अधिकारी विजय चव्हाण, नयन घाटे, नेहा घाटे, सीए गणेश खारोडे, अमोल चकनलवार, सचिन चकनलवार, डॉ. सोनलकुमार भगत, जया अंभोरे, के. के. सचदेवा, राहुल माकडे, फनिंद्र महाजन आणि जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. सचिन उंटवाले यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण पार पडले.

विविध गटांतील निकाल 

२१ किलोमीटर (खुला गट - पुरुष) : १. नागराज खुरासन, १ तास ५ मिनिटे २५ सेकंद, २. लीलाराम बावणे १ तास ९ मिनिटे ४४ सेकंद, ३. रितीक पंचबुद्धे १ तास १० मिनिटे २३ सेकंद.

२१ किलोमीटर (खुला गट - महिला) १. प्राजक्ता गोडबोले १ तास १९ मिनिटे १२ सेकंद, २. अर्पिता सैनी १ तास २३ मिनिटे २४ सेकंद, ३. रुक्मिणी साहू १ तास २३ मिनिटे ३५ सेकंद.

२१ किलोमीटर (डिफेन्स गट - पुरुष) : १. दीपक खांबोर १ तास ७ मिनिटे २७ सेकंद, २. गोल्डी गोस्वामी १ तास ९ मिनिटे २१ सेकंद, ३. रवी कुमार १ तास १० मिनिटे ४० सेकंद.

२१ किलोमीटर (डिफेन्स गट - महिला) : १. यामिनी ठाकरे १ तास २३ मिनिटे ५५ सेकंद, २. पूनम १ तास २८ मिनिटे १२ सेकंद, ३. मीनल भेदे १ तास ३९ मिनिटे २८ सेकंद

२१ किलोमीटर (व्हेटरन गट - पुरुष) : १. परशुराम कुनागी १ तास १७ मिनिटे, २. भास्कर कांबळे १ तास १८ मिनिटे ५१ सेकंद, ३. सुरेश कुमार १ तास २५ मिनिटे ५२ सेकंद.

२१ किलोमीटर (व्हेटरन गट - महिला) : १. इंदू टंडन १ तास ४४ मिनिटे ३६ सेकंद, २. विद्या धापोडकर १ तास ५३ मिनिटे ५३ सेकंद, ३. ज्योतीपूर्वा खाणीकर १ तास ५८ मिनिटे १३ सेकंद

२१ किलोमीटर (निओ व्हेटरन गट - पुरुष) : १. परशुराम भोई १ तास ११ मिनिटे २९ सेकंद, २. रमेश गवळी १ तास १३ मिनिटे ५ सेकंद, ३. धरमेंदर १ तास १६ मिनिटे १५ सेकंद.

२१ किलोमीटर (निओ व्हेटरन गट - महिला) : १. बिजोया बर्मन १ तास ३९ मिनिटे ४९ सेकंद, २. रंजना १ तास ४१ मिनिटे ६ सेकंद, ३. सीमा वर्मा १ तास ४६ मिनिटे ३१ सेकंद.

१० किलोमीटर (खुला गट - पुरुष) : १. शादाब पठाण ३० मिनिटे ४६ सेकंद, २. मोहित ३० मिनिटे ५७ सेकंद, ३. सौरव तिवारी ३० मिनिटे ५७ सेकंद.

१० किलोमीटर (खुला गट - महिला) : १. आकांशा शेलार ३५ मिनिटे ५८ सेकंद, २. सोनम चौधरी ३६ मिनिटे १० सेकंद, ३. रुबी कश्यप ३६ मिनिट ११ सेकंद.

१० किलोमीटर (व्हेटरन गट - पुरुष) : १. समीर कोलया ३७ मिनिटे २४ सेकंद, २. शिवलिंगप्पा गुतागी ३७ मिनिटे ३१ सेकंद, ३. मुकेश मिश्रा ३७ मिनिटे ५९ सेकंद.

१० किलोमीटर (व्हेटरन गट - महिला) : १. शारदा भोयर ५४ मिनिटे १७ सेकंद, २. रेणू सिद्धू ५४ मिनिटे ३४ सेकंद, ३. बाला रोकडे ५५ मिनिटे ३५ सेकंद.

१० किलोमीटर (निओ व्हेटरन गट - पुरुष) : १. लिंगन्ना मन्चीकांती ३४ मिनिटे ३५ सेकंद, २. अर्जुन साळवे ३४ मिनिटे, ३. मल्लिकार्जुन पारदे ३५ मिनिटे ०५ सेकंद.

१० किलोमीटर (निओ व्हेटरन गट - महिला) : १. विजया खाडे ४६ मिनिटे ५० सेकंद, २. सायुरी दळवी ४६ मिनिटे ५७ सेकंद, ३. गौरी गुमास्ते ४८ मिनिटे ६ सेकंद.

विजेत्यांच्या प्रतिक्रिया

सलग दुसऱ्या वर्षी लोकमत नागपूर महामॅरेथॉनचे विजेतेपद पटकावण्यात मी यशस्वी ठरले. यावेळी मी धावताना फार परिश्रम घेतले नाही. शक्य होईल तसे धावण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी करण्यासाठी लोकमत महामॅरेथॉन एक उत्तम व्यासपीठ आहे.

- प्राजक्ता गोडबोले, विजेती (२१ किलोमीटर खुला गट - महिला)

लोकमत महामॅरेथॉनसारखी मानाची स्पर्धा जिंकल्याचा निश्चितच अभिमान आहे. औरंगाबादमध्ये मी तिसरा होता. नागपूरमध्ये पदकाला सुवर्णझळाळी देण्यात मी यशस्वी ठरलो. लोकमत महामॅरेथॉन एम्स सर्टिफाईड असल्यामुळे निश्चितच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये याचा धावपटूंना फायदा होणार आहे.

- नागराज खुरासने, विजेता (२१ किलोमीटर खुला गट - पुरुष)

Web Title: Nagraj Khurasane, Prajakta Godbole winner of Nagpur 'Lokmat Mahamarathon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.