मालकाच्या भांडणात नाेकराचा खून; जीवे मारण्याची धमकी जीवावर बेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 10:41 PM2021-12-20T22:41:37+5:302021-12-20T22:42:10+5:30
Nagpur News भांडणात मालकाची बाजू घेत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नाेकराला दाेघांनी त्याचे हातपाय बांधून निर्जनस्थळी नेले आणि विहिरीत ढकलून त्याचा खून केला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील फेटरी-लाव्हा राेडवरील शेतात ८ नाेव्हेंबरच्या मध्यरात्री घडली.
नागपूर : भांडणात मालकाची बाजू घेत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नाेकराला दाेघांनी त्याचे हातपाय बांधून निर्जनस्थळी नेले आणि विहिरीत ढकलून त्याचा खून केला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील फेटरी-लाव्हा राेडवरील शेतात ८ नाेव्हेंबरच्या मध्यरात्री घडली असून, १९ डिसेंबर राेजी उघडकीस आली. याप्रकरणात पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे.
सचिन अनिल शिंदे (२४, रा. आयसी चाैक, हिंगणा राेड, नागपूर) असे मृताचे तर लाेकेश भगवान काळबांडे (३२) व आदर्श हुमनेकर (२२) दाेघेही रा. फेटरी, ता. नागपूर ग्रामीण अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. सचिन हा प्रफुल्ल दत्तू ढाेणे, रा. फेटरी यांच्याकडे वाहन चालक म्हणून नाेकरी करायचा. वडील अनिल किशन शिंदे यांनी ८ नाेव्हेंबर राेजी वाडी येथे साेडून दिल्यानंतर ताे घरी परतला नाही. ताे बेपत्ता असल्याची तक्रार नाेंदविण्यात आल्याने कळमेश्वर पाेलिसांनी त्याचा शाेध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान, शनिवारी (दि. १८) पाेलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे यांनी मिळालेल्या गाेपनीय माहितीच्या आधारे लाेकेश व त्याचा मित्र आदर्शला ताब्यात घेत विचारपूस केली आणि खुनाचे बिंग फुटले.
आराेपी लाेकेश व प्रफुल्ल ढाेणे यांच्यात ८ नाेव्हेंबरच्या सायंकाळी वाडी येथे भांडण झाले हाेते. या भांडणात सचिनने त्याचा मालक प्रफुल्ल यांची बाजू घेत लाेकेशचा गळा पकडला हाेता. भांडण शमल्यानंतर सचिन व प्रफुल्ल त्यांच्या ट्रकने फेटरीला परत आले तर लाेकेश त्याच्या मित्रांसाेबत वाडी येथे दारू पित बसला हाेता.
त्याच मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास फेटरी परिसरात लाेकेशला सचिन दिसल्याने त्याने भांडण उकरून काढले. शिवाय, त्याने आदर्शला ही बाेलावले. आधीच्या भांडणात सचिनने लाेकेश जीवे मारण्याची धमकी दिली हाेती. त्यामुळे दाेघांनी सचिनला बळजबरीने माेटारसायकलवर गाेन्ही शिवारात नेले. तिथे मारहाण करून त्याचे दाेरीने हातपाय बांधले आणि फेटरी-लाव्हा राेडवरील शेतात असलेल्या विहिरीत त्याला ढकलून दिले. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी भादंवि ३६४, ३०२, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे करीत आहेत.
...