गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:09 AM2021-01-20T04:09:36+5:302021-01-20T04:09:36+5:30

नागपूर : येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे नामकरण आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे झालेे आहे. मंगळवारी ...

Name of Balasaheb Thackeray to Gorewada International Zoo | गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

Next

नागपूर : येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे नामकरण आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे झालेे आहे. मंगळवारी मुंबईत ही घोषणा झाली. याबाबतचा नुकताच शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

नागपूरजवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारण्यात येत आहे. महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अखत्यारित असलेल्या या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.

...

भारतीय सफारीला होणार प्रारंभ

वैविध्यपूर्ण असलेल्या या उद्यानातील भारतीय सफारीचे काम पूर्ण झाले आहे. २६ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ती जनतेसाठी खुली केली जाणार आहे. या भारतीय सफारीमध्ये व्याघ्र सफारी, बिबट सफारी, अस्वल सफारी, तृणभक्षी प्राणी सफारीचा समावेश असेल. यासाठी प्राण्यांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. उद्घाटनानंतर ४० आसन क्षमतेची तीन विशेष वाहने व ऑनलाईन तिकीट बुकिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

...

असे आहे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय

- दोन हजार हेक्टर वनक्षेत्रावर उभारणी, महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून कामे पूर्ण

- नागपूर शहराच्या मध्यापासून प्रकल्पाचे अंतर फक्त सहा किलोमीटर

- भविष्यात निसर्ग पर्यटन आणि रोजगार संधीला वाव

- वन्यजीव संवर्धन, संशोधन व शिक्षण तसेच वन्यजीव पुनर्वसनाचे कामही प्राणी उद्यानात होणार

...

...

Web Title: Name of Balasaheb Thackeray to Gorewada International Zoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.